Uddhav Thackeray News : ही एकजूट विरोधी पक्षांची होणार नसून... उद्धव ठाकरेंनी स्पष्ट सांगितले

BJP News : उद्धव ठाकरेंची भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) जोरदार टीका
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Uddhav Thackeray News : मी 23 जूनला पाटण्याला चाललो आहे. आधी भाजपचे लोक 'मातोश्री'वर येत होते. आता सगळ्या पक्षाचे नेते येतात. विरोधी पक्षाचे सगळे नेते एकत्र येतील का? पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असेल? असे प्रश्न विचारले जातात. मात्र, आता ही एकजूट स्वातंत्रप्रेमीची आणि देशावर प्रेम असणाऱ्यांची होणार आहे, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुंबईतील शिवसनेच्या पदाधिकारी मेळाव्यात बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, पाटण्याला मी मुद्दामून चाललो आहे. विरोधी पक्ष म्हणजे कोण? कुणाचा विरोध, केवळ कोणतरी भाजप सत्तेत बसली आणि भाजप इतर पक्ष एकत्र येताहेत, असे नाही. हे जे होणार आहे, ती विरोधी पक्षांची एकजू होणार नाही. तर ती देशप्रेमींची आणि स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांची एकजूट होणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray News : ''सहनही होत नाही, सांगताही येत नाही! याचे उत्तम उदाहरण म्हणजे, देवेंद्र फडणवीस''

ते कुणीही असू शकतात, त्यामुळे कुणीही असले तरी आपल्या भारत मातेला जोखडात बांधू पाहण्याऱ्या भाजपच्या विरोधात एकत्र येणार आहेत असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. २३ जूनला पाटण्यामध्ये होणाऱ्या विरोधी पक्षांच्या बैठकीवर बोलताना ठाकरे यांनी भाजपला टोले लगावले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर चौफेर टीका केली.

दरम्यान, बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, सरकारला सत्तेची मस्ती दाखवायची असेल तर मणिपूरमध्ये दाखवावी, मला संताप एकाच गोष्टीचा येतो, उपरे नेते आपल्या घरात दमदाट्या करत आहेत. आपल्या घरात येऊन फोडापोडी करत आहेत, त्यांना मला एवढंच सांगायचे आहे की आम्ही नामर्दाची औलाद नाही आहे, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.

Uddhav Thackeray
Cabinet Extension News : 'मोदी @9' मुळे महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळ विस्तारालाही लागलाय ब्रेक?

मणिपूर पेटलेले. अगदी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनाही कुणी तिकडे जुमानत नाही. काय केले शाहांनी तिथे जाऊन? मोदी अमेरिकेत चालले आहेत. मात्र, मणिपूरमध्ये जायला तयार नाहीत. विश्वगुरु अमेरिकेत जाऊन विकत घेतलेल्या लोकांसमोर ज्ञान पाजळणार आहेत. मात्र, मणिपूर हे माझ्या देशातील राज्य आहे. देशात रशियन-युक्रेनचे युद्ध तुम्ही थांबवलेत ही भाकड कथा सांगितली आहे. ही भाकड-कथा सत्य करायची असेल तर मणिपूर शांत करून दाखवा जा, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com