माझ्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री केले असते तर मी राजकीय निवृत्ती घेतली असती...

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे दसरा मेळाव्यात घणाघाती भाषण
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसsarkarnama
Published on
Updated on

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात भाजपवर पुन्हा शरसंधान केले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही त्यांनी समाचार घेतला. तसेच हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा, असे आव्हानही त्यांनी षण्मुखानंद सभागृहात झालेल्या मेळाव्यात केले.

फडणवीस यांच्या मी अजूनही मुख्यमंत्री पदावर आहे असे वाटते या वक्तव्यावर टीका त्यांनी केला. काही जणांना वाटत होते की मी पुन्हा येईन. पण ते आलेच नाहीत. आता ते मी गेलोच नाही. मी गेलोच नाही, असे म्हणत असल्याचे ठाकरे यांनी सांगताच सभेत हशा उसळला. पदे येतात आणि जातात. मात्र त्याचा अहंकार नको, असे संस्कार माझ्यावर झाले आहेत. तो अहंकार आला की संपला. त्यामुळे मी मुख्यमंत्री म्हणून कधी वावरलो नाही. जनतेशी नम्रपणे राहिलो. त्यासाठी जनतेचे प्रेम कमवावे लागते, अशा भाषेत त्यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे `ईडी`ला धुणार की भाजपला?

मी काय बोलणार, कोणाचे वाभाडे काढणार याकडे अनेकांचे लक्ष आहे. माझ्या भाषणानंतर अनेक जण चिरकायला कधी मिळतेय याची वाट पाहत असल्याचे सांगत ठाकरे यांनी भाजप नेत्यांवर टीका केली. उठसूठ टीका करण्याची एक विकृती नव्याने आली आहे. ठाकरे कुटुंबियांवर हल्ला करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. असे हल्ले करणारा अजून जन्माला आलेला नाही. आला तर तिथल्या तिथे ठेचून काढू, असा इशारा त्यांनी दिला. ठाकरे कुुटुंबावर टीका करणे रोजगार हमीचे काम आहे. तुम्ही चिरकत राहा. पण माझा वाडा चिरेबंदी आहे. त्याला अजिबात तडे जाणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
मी देवेंद्रजींना विचारलंय...हमरीतुमरी किती पातळीपर्यंत करायची? : उद्धव ठाकरे

काॅंग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या हर्षवर्धन पाटील यांच्या विधानाचा उल्लेख करून त्यांनी त्याची खिल्ली उडवली. भाजपमध्ये गेल्याने चौकशी नाही, छापे नाही.त्यामुळे मला शांत झोप लागते, असे विधान पाटील यांनी केले होते. त्यावर बोलताना ठाकरे म्हणाले की ही काय लायकीची माणसे आहेत? ते अनाहूतपणे बोलून गेले. पण खरे बोलले. या आधी मला झोप येत नव्हती पण भाजपात गेल्याने मला कुंभकर्णासारखी झोप येते, अशी जाहिरात त्यांची लावायला हवी, असा टोमणा त्यांनी मारला.

शिवसेनेला आव्हान द्यायचं आणि पोलिसांच्या मागे लपाय,चं हा मर्दपणा नाही, असा इशारा त्यांनी भाजपला दिला. हिंदुत्वाच विचार होता म्हणून आम्ही भारतीय जनता पक्षाशी युती केली होती. जर तुम्ही शिवसेनेला दिलेले वचन पूर्ण केले असते तर तुम्ही पुन्हा मुख्यमंत्री झाले असता, याची आठवण त्यांनी भाजपला आणि फडणवीस यांना करून दिली. मी माझ्या पित्याला दिलेले वचन पूर्ण केलेले आहे. तुमचा शिवसैनिक मुख्यमंत्री करून दाखविन, असे मी वचन माझ्या वडिलांना दिले होते. पण काही परिस्थितीमुळे मला हे पद स्वीकारावे लागले. मात्र शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचे वचन मी पूर्ण करणारच आहे. तुम्ही जर माझ्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री केेले असते तर मी राजकीय जीवनातून बाजूला पण झालो असतो, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. आता या पदावर मी रोवून उभा असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com