Shiv sena UBT Dasara Melava 2023 : 'छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी सुरत लुटली होती. आणि इथून सुरतला पळणारे लाचार महाराष्ट्राचं हित कसं जपणार? सरकार बदलल्यानंतर सर्वात पहिले आरेची जागा मेट्रोला दिली, हे पहिलं काम यांनी केलं. काेरोना सेंटर उभारलं होतं ती जागा पहिले बुलेट ट्रेनच्या घशात घातली. इथल्या गद्दारांना पटकन सुरतला पळून जाता यावं म्हणून बुलेट ट्रेनची व्यवस्था करताय का?', असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला. महाराजांनी स्वराज्यासाठी सुरत लुटली होती. पण त्याचा सूड म्हणून तुम्ही आज मुंबई लुटताय आणि महाराष्ट्राचं खच्चीकरण करताय, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.
'काेराेना काळातील घोटाळ्याची चौकशी करायची असेल, तर मुंबईची जरूर करा. सगळ्या महापालिकांची करा. ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर महापालिकेचीही चौकशी करा. नागपूर उपमुख्यमंत्र्यांनी बुडवून दाखवलं, त्याचीही चौकशी करा. हिंमत तर पीएम केअर फंडापासून ते काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्व राज्यांची चौकशी करा होऊन जाऊ दे', असं म्हणत उद्धव ठाकरेंनी केंद्रातील सत्ताधारी भाजपला आव्हान दिलं.
'तुमचे नेते दिल्लीतून संपूर्ण देशाला रिकाम्या थाळ्या वाजवायला सांगत होते. त्यावेळी आमच्या सरकारने गरिबांना रिकामी थाळी नाही, तर ५ रुपयांत भरलेली थाळी दिली. याला म्हणतात सरकार. हे आमचं हिंदुत्व आहे. तुमच्या आणि आमच्या हिंदुत्वात हाच फरक आहे. थाळ्या बडवणारं तुमचं हिंदुत्व आणि शिवभोजन थाळी देऊन गरिबांचं पोट भरणारं आमचं हिंदुत्व आहे', अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.