उद्धव ठाकरे अन् अमित शहा यांच्या भेटीचं कारण ठरलं

अमित शहा (Amit Shah) यांच्यातील बैठकीनंतर लगेचच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार असल्याची शक्यता आहे.
Uddhav Thackeray Amit Shah
Uddhav Thackeray Amit Shahsarkarnama

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची रविवारी भेट होणार आहे. या भेटीकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. ही भेट कशासाठी होत आहे, ही भेट राजकीय की अराजकीय आहे, अशी चर्चा होत असताना या भेटीमागील विषय स्पष्ट झाला आहे.

अमित शहा (Amit Shah) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची ही भेट राजकीय नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री येत्या रविवारी सकाळी अमित शहा यांना भेटणार असल्याचे समजते. ही भेट राष्ट्रीय सुरक्षेचा भाग असल्याचे सूत्रांनी सांगितलं. महाराष्ट्रातील शहरी भागातील नक्षलवादाच्या विषयावरील ही भेट होणार असल्याचे समजते.

शहरी भागांतील नक्षवादी कारवाया थांबविण्यासाठी नेटवर्क वाढण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली आहे. दिल्लीमध्येही नक्षलवादी कारवाया वाढतील, अशी भीती व्यक्त केली जाते आहे. या पार्श्वभूमीवर ही भेट असल्याचे सांगण्यात आले. शहा हे सध्या नक्षवादाची समस्या असणाऱ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटी घेऊन या विषयासंदर्भात केंद्र आणि राज्य सरकारला एकत्रित कशापद्धतीने काम करता येईल याबद्दलची चर्चा करत आहेत. याच विषयावर चर्चा करण्यासाठी रविवारी उद्धव ठाकरे आणि अमित शाह भेटणार आहेत.

Uddhav Thackeray Amit Shah
प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी खुशखबर ; पन्नास वर्षापूर्वीच्या कायद्यात बदल

अमित शहा यांच्यातील बैठकीनंतर लगेचच उद्धव ठाकरे अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार असल्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यात नक्षलवादाच्या समस्या देशपातळीवर उपाययोजनांसाठी ही बैठक असेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीमुळेच लवकरच देशातील मुख्यमंत्र्याचीही बैठक होण्याची शक्यता आहे.

राज्यात गडचिरोली आणि चंद्रपूरसारख्या भागांमध्ये नक्षलवादाची कारवाया वाढत आहेत. या परिसरात विकास कामांना गती देण्यास केंद्राचे तसेच राज्याचे प्राधान्य आहे. मात्र, आता नक्षलवादाची समस्या मोठ्या शहरांमध्ये निर्माण होऊ शकते, अशी भीती गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली आहे. या गंभीर मुद्द्यावर केंद्र आणि राज्यांनी एकत्र काम करण्याची गरज असून पुढील वाटचाल कशी असावी, यासंदर्भात चर्चा करण्यासाठी शहा यांनी मुख्यमंत्र्यांना बोलावले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com