Uddhav Thackeray News : '' गद्दारांनी माझ्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणावा आणि...''; ठाकरे राजीनाम्यावर स्पष्टच बोलले

Supreme Court Final Decision on Shivsena Case : ...म्हणून मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama

Mumbai : अखेर सर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निकाल आला आहे. यात न्यायालयानं उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नसता तर ते सरकार परत आणलं असतं असं महत्वपूर्ण निरीक्षणही नोंदवलं. पण आता उद्धव ठाकरेंनी न्यायालयाच्या निकालावर रोखठोक मत व्यक्त करतानाच राजीनामा का दिलं यांचं कारणही

उध्दव ठाकरेंनी‘मातोश्री’वर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्यावर भाष्य केलं. यावेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे देखील उपस्थित होते.

Uddhav Thackeray
Cabinet Expansion : निकाल लागला; इच्छुक आमदारांचा आनंद गगनात मावेना, आता रस्सीखेच मंत्री होण्यासाठी !

उध्दव ठाकरे म्हणाले,हापापलेल्या लोकांनी माझ्याविरोधात अविश्वास आणावा आणि मी त्यांच्या विश्वासदर्शक प्रस्ताव सामोरं जावं हे मला मंजूर नव्हतंच..मंजूर नाहीच.. मी कदापि ते मान्य करणार नाही. म्हणून मी राजीनामा दिला. जसा मी एका क्षणाचाही विलंब न करता राजीनामा दिला. तसं सर्वोच्च न्यायालयाने एवढे फटके दिल्यानंतर थोडी तरी नैतिकता मुख्यमंत्र्यांच्या-उपमुख्यमंत्र्याच्या अंगी शिल्लक असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला सामोरं जावं असं म्हणत आपण ती चूक का केली याबाबत उद्धव ठाकरें(Uddhav Thackeray)नी पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण केलं आहे.

''माझ्या पाठीत वार केला,त्यांनी...''

ठाकरे पुढे म्हणाले, भावनिक होणं हा आमच्या घराण्याचा गुण किंवा दोष असेल. पण मी जे आता म्हटलं की, ज्या घराण्याने, पक्षाने ज्यांना सगळं काही दिलं.. आणि सगळं काही घेऊन सुद्धा ज्यांनी माझ्या पाठीत वार केला. त्यांनी माझ्यावर अविश्वास आणावा हे काही मला पटलेलं नाही. एक तर स्वत: गद्दार.. विश्वासघात त्यांनी केला. विश्वासघात करणाऱ्यांकडून मला विश्वासदर्शक ठरावाबद्दल विचारलं जात असेल तर ते अयोग्य आहे असा घणाघात ठाकरेंनी यावेळी केला.

Uddhav Thackeray
Shahaji Patil Reaction : शहाजीबापूंची तिखट प्रतिक्रिया : ‘काय झाडी, काय डोंगार, काय हिरवळ..राऊतांना हाणायला हुडकायला लागलाय झिरवळ...’

मी दिलेला राजीनामा हा चुकीचा असू शकतो...

तसेच कायदेशीरदृष्ट्या पाहिलं तर मी दिलेला राजीनामा(Resignation ) हा चुकीचा असू शकतो. पण नैतिकता पाहिली तर ज्या लोकांना माझ्या वडिलांनी, माझ्या पक्षाने सगळं काही दिलं तो लोकं माझ्याविरुद्ध माझ्याकडे बोट दाखवत असतील तर त्या लोकांवर मी विश्वास किंवा अविश्वास का दाखवू. त्या लोकांना मला प्रश्न विचारण्याचा अधिकारच नाही असंही ठाकरे यावेळी म्हणाले.

ज्या लोकांनी माझ्या पक्षाकडून सगळं घेतलं आणि गद्दारी केली.. गद्दार लोकं माझ्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणणार आणि मी त्यांचा सामना करू, हे कसं होऊ शकतं? आज तर कोर्टाने म्हटलं आहे.. कोर्टाने गद्दार म्हटलं नाही पण या सगळ्या गोष्टी आहेत.

Uddhav Thackeray
Maharashtra Poltical Crisis: तेव्हा कुठे गेली होती तुमची नैतिकता?; न्यायालयाच्या निर्णयानंतर फडणवीसांचा ठाकरेंना सवाल

राज्यपाल यंत्रणा अस्तित्वात ठेवावी की नाही...

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची(Bhagat Singh Koshyari) भूमिका संशयास्पद होती. ती अयोग्य होती. आता राज्यपालांच्या भूमिकेचंही वस्त्रहरण झालेलं आहे. मग ते दिल्लीच्या बाबतीत असेल, इथल्या बाबतीत असेल. ही यंत्रणा आदरयुक्त होती. पण, राज्यपाल यंत्रणेचे धिंडवडे, शासनकर्ते ज्यापद्धतीने काढत आहेत. ते बघितल्यानंतर राज्यपाल यंत्रणा अस्तित्वात ठेवावी की नाही, हाच मोठा विचार सर्वोच्च न्यायालयापुढे नेला पाहिजे असंही मत ठाकरेंनी यावेळी बोलून दाखवलं.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com