Chitra Wagh On Uddhav Thackeray
Chitra Wagh On Uddhav Thackeraysarkarnama

Chitra Wagh On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी गाणं गुणगुणलं; चित्रा वाघ म्हणाल्या, 'कशी नशिबानं थट्टा आज मांडली...'

Chitra Wagh Upset Uddhav Thackeray : महाविकास आघाडीची काल पत्रकार परिषद झाली. उद्धव ठाकरे यांनी महायुती आणि भाजपवर टीका करताना एका गाण्याची ओळ गुणगुणली होती. भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी त्यावर प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे.

Chitra Wagh News : महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी एका गाण्याच्या ओळी गुणगुणत महाविकास आघाडी भक्कम असल्याचे संकेत दिले. मात्र भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी या उद्धव ठाकरे यांना त्याच गाण्यातील पुढच्या ओळींची आठवण करून दिली. नाहीतर पुढच्या पत्रकार परिषदेत 'कशी नशिबानं थट्टा आज मांडली', ह्या गाण्याच्या ओळी गायची वेळ येईल, असे सांगत उद्धव ठाकरे यांना डिवचलं आहे.

महाविकास आघाडीची काल एकत्रित पत्रकार परिषद झाली. उद्धव ठाकरे, शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात असे दिग्गज नेते पत्रकार परिषदेला उपस्थित होते. या तिन्ही प्रमुख नेत्यांनी राज्यात महाविकास आघाडी भक्कमपणे आगामी विधानसभा निवडणुकीला समोरे जाणार असल्याचे सांगितले. उद्धव ठाकरे यांना पुन्हा भाजपमध्ये (BJP) जाणार का यावर विचारण्यात आल्यावर 'मी येथे आहे, येथे बसून सांग का', अशी मिश्किल टिप्पणी केली. यानंतर भाजपवर जोरदार प्रहार केला. 'जिथे जिथे रामचं वास्तव्य होते, तिथे भाजपनं सपाटून मार खाल्ला आहे. भाजपमुक्त राम झाला आहे', अशी टोलेबाजी उद्धव ठाकरे यांनी केली होती.

Chitra Wagh On Uddhav Thackeray
Video Uddhav Thackeray : मला भाजपसोबत जायचं आहे, पण...; उद्धव ठाकरेंनी सांगितला 'प्लॅन'

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कालच्या पत्रकार परिषदेतून भाजपवर केलेल्या टीकेला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी रिटर्न उत्तर दिलं आहे. चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे यांना उद्देश ट्विट केले आहे. तुम्ही काल गुणगुणलेल्या गाण्याच्या ओळी काँग्रेसने तुम्हाला पूर्णपणे गुंडाळून टाकल्याच्या निदर्शक होत्या. पण, त्याच गाण्याच्या पुढच्या ओळी अशाही आहेत की, 'असेल का हे नाटक यांचे, मज वेडीला फसवायचे? कपट का करिती चक्रधारी? का वारा ही जगासारखा. तिचाच झाला पाठीराखा, वाहते दौलत तीज सारी!' ट्विटवर या ओळी शेअर करत ठाकरे यांनी याकडे पण लक्ष द्यावे. नव्या सहकाऱ्यांपासून सावध राहा, असा सल्ला देखील चित्रा वाघ यांनी दिला.

Chitra Wagh On Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : पंतप्रधान मोदी अन् अमित शाहांवर उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप; म्हणाले, देश अन्...

चित्रा वाघ या सल्लावर नुसत्या थांबल्या नाहीत तर, उद्धव ठाकरेंवर पुढल्या पत्रकार परिषदेत 'कशी नशिबानं थट्टा आज मांडली', ह्या गाण्याच्या ओळी गायची वेळ या सहकाऱ्यांमुळे येईल, असा धोका देखील सांगितला. चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे यांना त्यांच्या महाविकास आघाडीतील सहकाऱ्यांविषयी संशय व्यक्त करून दिला आहे. चित्रा वाघ यांच्या या उत्तराला शिवसेना ठाकरे गटाकडून किंवा महाविकास आघाडीतील मित्रपक्षांकडून कसे प्रत्युत्तर मिळते, याकडे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com