Shiv Sena News: शिंदेसेनेच्या नेत्यानं वात पेटवली ; ठाकरेसेनेत फटाके फुटण्यास सुरवात, अचूक टायमिंग साधलं!

Murbad Assembly Constituency election 2024: बदलापूर शहराचा समावेश असलेल्या मुरबाड मतदारसंघात भाजप उमेदवार किसन कथोरे आणि वामन म्हात्रे यांच्यात निवडणुकीपूर्वीच काही तरी बिनसलं असल्याची चर्चा आहे. त्यामुळे यंदा म्हात्रे यांनी असहकार पुकारला आहे.
Murbad Assembly Constituency election
Murbad Assembly Constituency electionSarkarnama
Published on
Updated on

Badlapur News: विधानसभा नि़वडणुकीत शिंदेसेनेचे शहराध्यक्ष आणि ठाकरेसेनेतील नेते यांच्या दिवाळी भेटीची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया देत दोन्ही नेत्यांना टोले लगावले आहेत.

बदलापूरचे शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे सचिव आणि उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक, आमदार मिलिंद नार्वेकर यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो स्वतः वामन म्हात्रे यांनीच फेसबुकवर टाकले. त्यामुळे या पोस्टमधून म्हात्रे यांनी अचूक टायमिंग साधल्याची चर्चा बदलापुरात रंगली आहे.

'दरवर्षीप्रमाणे दिवाळीनिमित्त नार्वेकर यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या, या भेटीत जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. राजकीय घडामोडींवरही चर्चा झाली,' असं वामन म्हात्रे यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

या भेटीमुळे बदलापूर शहरात चर्चांना उधाण आलं आहे. कारण बदलापूर शहराचा समावेश असलेल्या मुरबाड मतदारसंघात भाजप उमेदवार किसन कथोरे आणि वामन म्हात्रे यांच्यात निवडणुकीपूर्वीच काही तरी बिनसलं असल्याची चर्चा आहे. त्यामुळे यंदा म्हात्रे यांनी असहकार पुकारला आहे.

Murbad Assembly Constituency election
Karuna Sharma: करुणा शर्मा मुंडे ढसाढसा रडल्या! म्हणाल्या, 'तो राक्षस आहे. मी 26 वर्ष त्याला स्वत:चं रक्त पाजलं...' VIDEO पाहा

आधी शिंदेंसेनेत असलेले आणि सध्या महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष पवार यांच्याशी मात्र म्हात्रे यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे वामन म्हात्रे यांनी अचूक टायमिंग साधत या पोस्टमधून अप्रत्यक्षपणे काही संकेत दिल्याची चर्चा बदलापूरमध्ये आहे.

आता म्हात्रे हे महाविकास आघाडीच्या सुभाष पवार यांना अप्रत्यक्षपणे मदत करतील अशी शक्यता बदलापूर मध्ये व्यक्त होत असून ऐन निवडणुकीत म्हात्रेंच्या या भेटीमुळे आगामी काळात फटाके फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वामन म्हात्रे यांनी दिला होता बंडखोरीचा इशारा

मुरबाड मतदारसंघ महायुतीत शिवसेनेला मिळावा अशी मागणी वामन म्हात्रे आणि सुभाष पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत केली होती. मात्र महायुतीने भाजपाच्या किसन कथोरे यांनाच पुन्हा संधी दिल्यामुळे नाराज म्हात्रे हे बंडखोरीच्या पवित्र्यात होते. मात्र त्यांनी बंडखोरी केली नाही. दुसरीकडे सुभाष पवार यांनी मात्र पक्षांतर करत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळवली.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com