उद्धव ठाकरेंची आरपारच्या लढाईची घोषणा; म्हणाले, आपल्याला जिंकायचचं आहे...

Uddhav Thackeray | यापूर्वीही माझा स्वतःचा भाऊ आणि बाळासाहेब ठाकरेंच्या काही जवळच्या विश्वासू लोकांनीच आपला विश्वासघात केला.
Uddhav Thackeray |
Uddhav Thackeray |
Published on
Updated on

Uddhav Thackeray| मुंबई : नोटबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे घासलेलं आणि संपलेलं नाणं आहे. तरीही हेच नाणं घासून घासून वापरत आहेत. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्याशिवाय भाजपला महाराष्ट्रात पर्याय नाही हे त्यांना माहीत आहे. त्यामुळेच 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने आपल्यासोबत युती केली, अशा शब्दांत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात आज मातोश्रीवर महत्त्वाची बैठक पार पडली. शिवसेना नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, विभागप्रमुख या बैठकीला उपस्थित होते. आता शिवसेनेच्या ठाकरे, शिंदे या दोन्ही गटांच्या हालचालींना वेग आला आहे.

Uddhav Thackeray |
'मातोश्री'वरील बैठक संंपली; उद्धव ठाकरेंचा समर्थकांना महत्त्वाचा संदेश...

''आपला हा निखाऱ्यावरचा प्रवास आहे. आपल्यासाठी ही शेवटची आणि मोठी लढाई आहे. ही लढाई आपल्याला जिंकायची आहे. ही लढाई जिंकली तर महाराष्ट्रात कोणीही आपल्यासमोर टिकू शकणार नाही. असा विश्वास यावेळी उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या नावाशिवाय भाजपला महाराष्ट्रात पर्याय नाही हे त्यांना चांगलंच माहीत आहे. त्यामुळे ते शिवसेना संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. असा हल्लाबोलही त्यांनी केला आहे. तसेच, पक्षातून फुटल्यानंतरही त्यांना बाळासाहेबांचं नाव का लागतं, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

यापूर्वीही माझा स्वतःचा भाऊ आणि बाळासाहेब ठाकरेंच्या काही जवळच्या विश्वासू लोकांनीच आपला विश्वासघात केला. पण आपण त्या सर्वांचा पराभव केला, त्या सर्वांना आपण त्यांना पुरुन उरलो, असा अप्रत्यक्ष टोलाही त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि नारायण राणेंना लगावला.

यापूर्वीही अनेक लोक शिवसेना सोडून निघून गेले, तरीही शिवसेना संपली नाही, पण आता ही आपली शेवटची लढाई आहे. आज आपल्याला परत एकदा सर्वांना एकत्रित यायंच आहे. आपल्याला संघर्ष करायचा आहे. संघर्षासाठी तयार रहा, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षातील सदस्यांना केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com