MVA News: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंचं मोठं पाऊल, शरद पवारांकडे 'हा' प्रस्ताव दिल्याची चर्चा...

Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत शरद पवार यांनी राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली होती.
MVA News
MVA NewsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह ४० आमदार बंडखोरीच्या तयारीत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. तसेच ते लवकरच भाजपसोबत जाणार असल्याचंही बोललं जात आहे. अर्थात यावर अजित पवारांनी स्वत:माध्यमांसमोर येत या सर्व अफवा असल्याचं स्पष्ट केलं आहे. तरीदेखील त्यांच्या बंडखोरीच्या चर्चा अद्याप थांबलेल्या नाहीत हेही वास्तव आहे.

तसेच अजितदादांनी मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकण्यास तयार असल्याबाबत विधान केलं होतं. याचदरम्यान, आता महाविकास आघाडी टिकण्याच्या उद्देशाने व अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदासाठी उध्दव ठाकरेंनी मोठं पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे.

MVA News
Ashish Deshmukh News : सावनेरमध्ये भाजप डॉ. आशिष देशमुखांवर डाव खेळणार? बावनकुळेंच्या भेटीनंतर रंगली चर्चा !

एकीकडे राज्यात महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभांनी एकापाठोपाठ धडाका लावला आहे. आणि या सभांना मिळणारा प्रतिसाद देखील दिवसागणिक वाढताच आहे. याचवेळी महाविकास आघाडीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याच्या राजकारणासह आघाडीच्या गोटातही मोठी खळबळ उडवून दिली होती.यानंतर त्यांनी जागा वाटप निश्चित न झाल्यानं आपण तसं विधान केलं असल्याचं स्पष्टीकरण दिलं. पण तरीदेखील आघाडीमध्ये पडद्यामागं अनेक खलबतं सुरु असल्याचं लपून राहिलेलं नाही.

एकीकडे अजित पवारां(Ajit Pawar)नी जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे सांगितले होते. मात्र, याचवेळी शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली उद्या राष्ट्रवादीचे शिबिराच्या निमंत्रण पत्रिकेत अजित पवारांचं नाव नसल्याचं समोर आल्यानंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते.या शिबीरासाठी मुंबई विभागीय राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे २००० हून अधिक प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. परंतु, अजित पवारांच्या अनुपस्थितीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या.

MVA News
Lok Sabha MP : मोदी सरकारचा नवा प्लॅन?; देशातील लोकसभा-राज्यसभा खासदारांच्या संख्येत होणार मोठा बदल!

मागील काही दिवसांमध्ये आघाडीतील नेतेमंडळीमधील एकमेकांवरील आरोप - प्रत्यारोप, अदानी, पंतप्रधान मोदींच्या पदवी यांसारख्या विविध मुद्द्यांवरील मतभेद चव्हाट्यावर आले होते. यानंतर आघाडीच्या भवितव्याबद्दल प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं. अशातच आता महाविकास आघाडीच्या अस्तित्वासाठी ठाकरे गट पुढे आला आहे. आगामी काळात महाविकास आघाडीची सत्ता आल्यास राष्ट्रवादीला मुख्यमंत्री पद देण्याचा प्रस्ताव उद्धव ठाकरे यांनी दिल्याची माहिती आहे.

काय आहे ठाकरे गटाचा प्रस्ताव?

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आगामी काळात महाविकास आघाडीची सत्ता आल्यास राष्ट्रवादीला मुख्यमंत्री पद देण्याची तयारी दाखविली असून तसा प्रस्तावच त्यांनी दिल्याची माहिती खात्रीशीर माहिती समोर येत आहे. आघाडीमध्ये कोणाला कितीही जागा आल्या तरी मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होईल अशी ग्वाही उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना या प्रस्तावात दिली आहे.

MVA News
Maharashtra Politics : सुशीलकुमार शिंदे पुढे येताच विखे पाटलांनी केला चरणस्पर्श...

अद्याप संधी येऊन देखील राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होऊ शकला नसल्याची खंत नुकतीच अजित पवारांनी व्यक्त केली होती. पण आता संधी मिळाल्यास राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सिल्वर ओकवर ठाकरे-पवार भेट झाली, त्यावेळी याबाबत बोलणी झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com