Shridhar Patankar ED Raid : उद्धव ठाकरेंचे मेहुणे पाटणकरांच्या कार्यालयावर छापे; सोमय्या म्हणाले..

Shridhar Patankar ED Raid : 'उद्धव ठाकरे हिशेब तर द्यावाच लागेल..'
Shridhar Patankar ED Raid : Uddhav Thackeray ; Kirit Somayya
Shridhar Patankar ED Raid : Uddhav Thackeray ; Kirit SomayyaSarkarnama

Mumbai News : शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thakare) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (Shreedhar Patankar) यांच्यावर बेकायदा मालमत्तेसंबंधी सीबीआय (CBI) कडून चौकशी सुरु होती. याच प्रकरणात आता मोठी माहिती मिळत आहे. पाटणकर आणि त्यांचे बीजनेस पार्टनर नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या मुंबई, युपी, कोलकाता, दिल्ली कार्यालयावर आयकर विभागाचे छापे पडले आहेत, असे भाजपचे नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी एका व्हिडीओद्वारे सांगितले आहे. (Latast Marathi News)

Shridhar Patankar ED Raid : Uddhav Thackeray ; Kirit Somayya
Rahul Narvekarयांचे सूचक विधान, शिंदेंचे आमदार अपात्र होणार? | Shivsena |16MLA Disqualification Case

किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मेहुणे श्रीधर पाटणकर यांचा उल्लेख करत एक व्हिडीओ जाहीर केला आहे. यामध्ये सोमय्या यांनी म्हंटले की, उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर आणि त्यांचे व्यावसायिक भागीदारी नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या मुंबई, युपी, कोलकाता, दिल्ली कार्यालयावर आयकार छापे पडले आहेत. उद्धव ठाकरेंना तर हिशेब द्यावाच लागेल, सोमय्या म्हणाले.

Shridhar Patankar ED Raid : Uddhav Thackeray ; Kirit Somayya
The Kerala Story : Devendra Fadanvis यांचे Jitendra Awhad यांना प्रत्युत्तर | BJP | NCP | Sarkarnama

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याबाबत सातत्याने आरोप करीत उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले होते. त्यांनी सातत्याने आरोप करीत याबाबत आपल्याकडे सबळ पुरावे असल्याचा दावा केला होता. त्यानुसार श्रीधर पाटणकर यांच्यावर आजची ही कारवाई करण्यात आली आहे. यामुळे याप्रकरणी आता पुढे काय होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com