Milind Narwekar Victory : उद्धव ठाकरेंचे 'राइट हॅन्ड' अन् 'अजातशत्रू' मिलिंद नार्वेकर विजयी!

Vidhan Parishad Election : मिलिंद नार्वेकर हे 17 आणि 22 मतांवर बराच वेळ अडकले होते.
milind narvekar.jpg
milind narvekar.jpgsarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधान परिषदेच्या रिंगणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सर्व पक्षातील नेत्यांशी सलोख्याचे संबंध असलेले मिलिंद नार्वेकर यांना उतरवले होते. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. त्यानुसार मतमोजणीच्या पहिल्या काही सेकंदातच नार्वेकरांनी मतांची आघाडी घेतली. त्यामुळे ते सर्वात आधी विजयी होतील असे वाटू लागले. मात्र, अनपेक्षितपणे त्यांना एका मतासाठी तासभर झुंजावे लागल्याचे प्रत्यक्षात दिसून आले. अखेर 24 मतं मिळवून नार्वेकर यांचा विजय झाला आहे.

मिलिंद नार्वेकर हे सर्वपक्षीय उमेदवार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते. त्यामुळे नार्वेकर हे सहज निवडून येणार, असा विश्वास दोन्ही शिवसेनेला होता. मतमोजणीतही भाजपचे योगेश टिळेकर यांच्यासह मिलिंद नार्वेकरांनी आघाडी घेतली होती. काही मिनिटांतच नार्वेकार सर्वात आघाडीवर पोचले होते. त्यानंतर ते १७ मतांवर काही काळ अडकले.

मिलिंद नार्वेकर 17 मतांवर अडकले असताना भाजपचे टिळेकर, अमित गोरखे, पंकजा मुंडे यांच्यासह पिछाडीवर असलेले महायुतीचे आणि काँग्रेसच्या प्रज्ञा सातव विजयी झाल्या. त्यानंतर नार्वेकरांची गाडी 22 मतांवर पुन्हा अडकली. त्यांना विजयाचा जादुई आकडा गाठण्यासाठी एका मताची गरज होती. मात्र, एका मतासाठीच नार्वेकरांना दीर्घ प्रतिक्षा करावी लागली.

उद्धव ठाकरे यांनी स्वतः मिलिंद नार्वेकर यांच्या विजयाची स्ट्रॅटेजीही आखली होती. त्यासाठी ठाकरे सकाळीच विधीमंडळात पोचून विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या कार्यालयातून सूत्रे हलवली. उद्धव ठाकरे हे विधानमंडळात ठाण मांडून बसले होते.

दरम्यान, विधिमंडळात नार्वेकरांनीही भाजपचे आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर यांच्यात गुफ्तगू झाले होते. त्यामुळे नार्वेकरांचा विजय सहज होईल, असे वाटत होते. मात्र, २२ वर अडकलेल्या नार्वेकरांना एका मतांसाठी तासाहून अधिक वेळ वाट पाहावी लागली होती. त्यानंतर दुसऱ्या पसंतीच्या 3 मते अधिक मिळाली असून 24 मतांनी मिलिंद नार्वेकर यांचा विजय झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com