शांत आहोत तर शांत राहू द्या; पिसाळायला लावू नका : उद्धव ठाकरेंचा इशारा

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची चौफेर टीका
Uddhav thackeray
Uddhav thackeraySarkarnama

Uddhav Thackeray : मी सांगतो शांत राहा, म्हणून सगळे शिवसैनिक शांत आहेत. जोपर्यंत शांत आहे, तोपर्यंत त्यांना शांत राहू द्या. पिसाळायला लावू नका, जर शिवसैनिकावर अन्याय कराल, तर तो आम्ही सहन करणार नाही, असा इशारा शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिला.

तुमचा कायदा तुमच्या मांडीवर कुरवाळत बसा. पोलिसांकडून शिवसैनिकांना शिंदे गटात जाण्यासाठी धमक्या दिल्या जात आहे. हा तुमचा कायदा आहे का, असा सवाल ठाकरे यांनी केला. एवढेच नाही, तर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतही धमकी दिली जाते. त्या गटात जा नाहीतर तुमच्या केसेस काढतो. काय सलून काढले तुम्ही केसेस काढण्याचे, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.

Uddhav thackeray
कपाळावरचा गद्दारीचा शिक्का या जन्मीतरी पुसला जाणार नाही : उद्धव ठाकरे

काय कायद्याच्या चौकटीत बोलायचे, मिंधे गटाचे आमदार तिथे गेले. मिंधे गटातील कुणी गोळीबार करतो, कुणी चुन चुन के मारेंगेची भाषा करतो. हा तुमचा कायदा असेल तर तो आम्ही जाळून टाकू, असा इशारा त्यांनी दिला. आमच्यापैकी कुणी बोलले, त्याला उचलून आत टाकता. तुम्ही कुठल्या पद्धतीने कायदा चालवताय, असे सवाल त्यांनी केले.

देवेंद्र फडणवीसांना कायदा चांगला कळतो, हा टोमणा नाही, अशी कोपरळली, उद्धव ठाकरे यांनी केली. फडणवीसांना कायद्यातले चांगले कळते. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. जाताना बोलून गेले होते की मी पुन्हा येईन, पुन्हा दीड दिवस आले. दिड दिवसात विसर्जन झाले, असा टोला त्यांनी लगावला.

Uddhav thackeray
सुषमा अंधारेंनी शिंदे गटातील आमदारांची कुंडलीच मांडली

मनावर दगड ठेवून उपमुख्यमंत्री म्हणून पुन्हा आले. मी खरे बोलतो. मी कुठे टोमणा मारतो. आता ते म्हणतायत कायद्याच्या चौकटीत बोला, देवेंद्रजी, तुम्ही गृहमंत्री आहात. मात्र, आम्हाला सगळ्यांना कायदा कळतो. कायदा सगळ्यांनी पाळायला पाहिजे. आम्ही कायदा पाळायचा आणि तुम्ही ही डुकरे पाळायची, हे चालणार नाही, असा इशारा ठाकरे यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com