Omie Kalani Supporters BJP Meeting : भाजप उल्हासनगरचा 'कल' समजून घेतोय? कलानी समर्थक, माजी नगरसेवक रवींद्र चव्हाणांच्या संपर्कात

Ulhasnagar Omie Kalani Supporters Former Corporators Meet BJP Ravindra Chavan: उल्हासनगरमधील ओमी पप्पू कलानी यांचे समर्थक अन् माजी नगरसेवकांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन प्रवेशावर चर्चा केली.
Omi Kalani
Omi KalaniSarkarnama
Published on
Updated on

Ulhasnagar Political Developments: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, शत प्रतिशत भाजप, अशी तयारी महायुतीमधील भाजपने सुरू केली आहे. मुंबई महापालिका वगळता, ग्रामीण भागात महायुतीमध्ये राजकीय लढाई होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे मुंबईत भाजपने संघटन वाढवण्याची आणि ते बळकट करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे महायुतीमधील मित्रपक्षांसह विरोधकांचे पदाधिकारी भाजपमध्ये आले, तरी त्याचे स्वागत केले जात आहे. उल्हासनगरमध्ये देखील भाजप मोठी उलथापालथ करण्याच्या तयारीत आहे. कलानी समर्थक भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे.

कलानी समर्थक असलेल्या काही नगरसेवकांनी भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्‍हाण आणि प्रवक्त्या श्‍वेता शालिनी यांची भेट घेतल्याने उल्हासनगरमध्ये राजकीय उलथापालथीच्या चर्चांना उधाण आले. येत्या दोन दिवसांत हे नगरसेवक भाजपमध्ये जाहीर प्रवेश करणार असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली आहे.

उल्हासनगर आणि कलानी असं काही समीकरण आहे. परंतु कलानी समर्थकांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी भेट घेतल्याने उल्हासनगरची राजकीय गणितं भाजपच्या हाती जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. कलांनी यांची उल्हासनगरवर एकहाती राजकीय पकड राहिली आहे. समर्थकांनी भाजप प्रदेशाध्यक्षांची भेट घेतल्याने ही पकड काहीशी सैल झाल्याची चर्चा आहे.

Omi Kalani
Ajit Pawar Tanpure Controversy : 'तनपुरे वाड्या'वर बंद दाराआड बरचं काही घडलं, अजितदादांनी पुढचं राजकाराण पेरलं!

पप्पू कलानी व दिवंगत ज्योती कलानी यांनी आमदारकी भूषविली आहे. ओमी कलानी यांची पत्नी पंचम कलानी यांनीही महापौरपद भूषवले आहे. 2017च्या महापालिका निवडणुकीत ओमी कलानी यांनी भाजपसोबत हातमिळवणी केल्याने पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचा महापौर बनला होता. आता कलानी समर्थकच भाजपकडे गेल्याने ओमी कलानी राजकारणात कोणता निर्णय घेणार, याकडे लक्ष लागले आहे.

Omi Kalani
Ajit Pawar on Munde Kokate issue : मुंडे 'इन' तर कोकाटे 'आऊट'? निर्णय कोण अन् कसा घेणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

राज्यात महाविकास आघाडीची स्थापना झाल्यावर ओमी कलानी यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षासोबत गेले होते. त्यांनी मागील विधानसभा निवडणूकही लढवली होती. तेव्‍हा त्यांच्यासोबत सर्वच माजी नगरसेवक होते. आता यातील काही माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर असल्याने कलानी यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे कलानी यांच्या पुढील रणनीतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संजय सिंह (चाचा), सतरामदास जेसवानी, प्रभुनाथ गुप्ता, रवी बागूल, रमेश चैनानी, हरेश जग्यासी या माजी नगरसेवकांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांची भेट घेतली. चव्‍हाण यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान कलानी यांचे काही हितचिंतकही उपस्थित होते.

संजय सिंह यांनी या भेटीवर प्रतिक्रिया देताना म्हटले की, आम्ही काही माजी नगरसेवक लवकरच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, प्रवक्त्या श्‍वेता शालिनी यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश करणार आहोत. आणखी काही नगरसेवक आमच्यासोबत येणार असल्याचे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com