Jayant Patil
Jayant PatilSarkarnama

Jayant Patil News: अमित शाहांची भेट घेतलीच नाही; जयंत पाटलांनी दावा खोडून काढला

Jayant Patil on Amit Shah : जयंत पाटील यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या.

Mumbai News: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. मात्र, या सर्व चर्चा जयंत पाटलांनी फेटाळून लावल्या असून माझी कोणाशीही चर्चा झाली नाही, मी अमित शाह यांना भेटलो नसल्याचे स्पष्टीकरण पाटलांनी दिले.

"प्रसारमाध्यमांवरील बातम्या ऐकल्या आणि माझे मनोरंजन झाले. मी कालही पवार साहेबांना भेटलो. शनिवारी रात्री मी माझ्या पक्षातले वरिष्ठ आमदार आहेत, त्यांच्याशी चर्चा केली आणि आज सकाळी देखील मी पवार साहेबांना भेटलो. त्यामुळे ज्या बातम्या चालवल्या आहेत, त्यामध्ये तथ्य नाही. मी पुण्यात भेटलो किंवा अन्य कुठे भेटलो, यात कुठलीही स्पष्टता नाही", असे जयंत पाटलांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

Jayant Patil
Ajit Pawar News : भाजपसोबत जाण्याचा निर्णय का घेतला?; अजितदादांनी अमित शहांसमोरच सगळं सांगून टाकलं...

"मी अमित शाह यांना कधी भेटलो याचे संशोधन करा. याबद्दलच्या चर्चा कोण करतंय, त्याबाबतही चौकशी करा. मी कालही इथेच होतो आणि आजही इथेच आहे. ज्या बातम्या पसरवल्या जात आहेत, त्या बातम्यांमध्ये कुठेतरी कोणी गैरसमज पसरवत आहे, असं मी म्हणणार नाही, कारण या बातम्या माध्यमांवरच्या आहेत. मात्र, माझी सर्वांना विनंती आहे, अशा बातम्या चालवताना खात्री बाळगूनच चालवायला हव्यात", असेही पाटील म्हणाले.

Jayant Patil
Amit Shah Pune Visit : अमित शहांच्या दौऱ्यामुळे अनेकांना काही तास राहावे लागले पोलिसांच्या नजरकैदेत !

"जर अशा पद्धतीने कुणाला भेटायचे असेल तर तुम्हाला सांगेल. तुम्हाला सांगूनच जाईल. भाजप अशा प्रकारच्या बातम्या पेरतो असे मी म्हणणार नाही. कारण बातम्या पेरणारे तुम्ही. त्यांना बडबडून काय उपयोग?, कुणी बातम्या पेरल्या याची माहिती सध्यातरी माझ्याकडे नाही", असे स्पष्टीकरण देत जयंत पाटलांनी चर्चांना पूर्ण विराम दिला.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com