अगामी लोकसभेत सामना रंगणार? अनुराग ठाकूर अन् श्रीकांत शिंदेंचे दावे-प्रतिदावे

Anurag Thakur : अनुराग ठाकूर तीन दिवसीय कल्याण-डोबिंवली मतदार संघाच्या दौऱ्यावर
Anurag Thakur, Shrikant Shinde
Anurag Thakur, Shrikant Shindesarkarnama

कल्याण : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात भाजपने (BJP) मायक्रो प्लॅनिंग करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील निवडक १६ मतदार संघात थेट केंद्रातून नेते पाठवण्यात येत आहेत. यामध्ये खासकरुन राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शिवसेनेकडे असलेले मतदारसंघ लक्ष करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) सध्या कल्याण-डोंबिवली दौऱ्यावर आहेत. कल्याण-डोंबिवली मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सुपुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) हे खासदार आहेत.

कल्याण लोकसभा मतदार संघात भाजपने ताकद वाढविण्यास सुरुवात केल्याने आगामी लोकसभा निवडणुकासाठी इथून भाजपचा उमेदवार असणार का? याबाबतच्या राजकीय वर्तुळात चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत. याबाबत आज श्रीकांत शिंदे आणि अनुराग ठाकूर यांना थेट प्रश्नही विचारण्यात आले. मात्र, माध्यमांमध्ये सुरु असलेल्या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे या दोन्ही नेत्यांनी सांगितले. मात्र, अप्रत्यक्षपणे दोघांनीही आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून दावे-प्रतिदावे केले आहेत.

Anurag Thakur, Shrikant Shinde
श्रीकांत शिंदेंनी, अनुराग ठाकुरांना दिलेल्या शालीचीच चर्चा

ठाकूर यांचे कल्याण-डोंबिवली मतदारसंघात स्वागत करण्यात आले. या स्वागत समारंभाला श्रीकांत शिंदेही उपस्थित होते. या वेळी बोलताना ते म्हणाले, पुढील तीन दिवस मी इथे आहे. या दौऱ्यात युवक, युवती, व्यापार विभाग अशा सर्वांच्या भेटीगाठी घेणार आहे. यातून जमिनीवर मजबूत असेलेला पक्ष अधीक मजबूत करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.

या सगळ्यासाठी तुमचे सहकार्य मला मिळेल, असा मला विश्वास आहे, असेही त्यांनी कार्यकर्त्यांना म्हणाले. देशभरात एकूण १४४ मतदारसंघामध्ये आमचा प्रवास सुरु आहे. यामध्ये मंत्री आणि पक्षाचे बडे नेते असणार आहेत. यामध्ये एका मतदारसंघाची जबाबदारी माझ्यावर आहे. त्यामुळे केवळ आताच नाही, तर पुढील २ वर्ष सातत्याने येणे-जाणे असणार आहे. पक्षाला आणखी मजबूत करणार करण्याचा प्रयत्न असणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Anurag Thakur, Shrikant Shinde
ठरलं.. सेना भवनापासून हाकेच्या अंतरावर सुरू होणार शिंदे गटाचे शिवसेना भवन

भाजपने हा दौरा सहा महिन्यांपूर्वी आयोजित केला होता. त्यानुसार केंद्रीय मंत्र्यांचे कार्यक्रम आहेत. प्रत्येक पक्षाला संघटना मजबूत करायचा अधिकार आहे. त्यानुसार तो कार्यक्रम आयोजित केला आहे. कल्याण लोकसभा मतदार संघावर भाजपचा दावा असे, वक्तव्य काही पदाधिकाऱ्यांनी केले आहे. मात्र, हा शिवसेनेचा मतदार संघ आहे. येथील खासदार मी असून 2024 मध्ये देखील श्रीकांत शिंदेच युतीचे उमेदवार असतील, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. कल्याण डोंबिवलीमधून नेमका कोण उमेदवार असणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तसेच भाजप पक्षवाढीसाठी प्रयत्न करत असल्याने भाजप आणि शिंदे गटामध्येच सामना रंगणार का? असा सवाल देखील उपस्थित होते आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com