Raosaheb Danve : दानवेंनी 'त्या' व्हिडिओ बाबत दुसऱ्यांदा माफी मागितली..

Raosaheb Danve : दानवेंचा यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे.
Raosaheb Danve
Raosaheb DanveSarkarnama

Raosaheb Danve : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या भाजप नेत्यांच्या विरोधात राज्यात पडसाद उमटत आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, सुधांशु त्रिवेदी,मंगलप्रभात लोढा,आमदार संजय गायकवाड, प्रसाद लाड यांच्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेल्या विधानानंतर त्यांचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. (Raosaheb Danve on shivaji maharaj viral video)

दानवे यांचा एक व्हिडिओही सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. दानवेंचा यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. या व्हिडिओमध्ये दानवेंनी शिवाजी महाराज यांचा अपमान केल्याचे दिसते. या व्हिडिओबाबत दानवे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. दोन वर्षांपूर्वी केलेल्या वक्तव्याबाबत मी पुन्हा एकदा जनतेची माफी मागतो, असेही दानवेंनी म्हटले आहे. रावसाहेब दानवेंनी व्हिडिओ जारी करत आपली बाजू मांडली आहे.

Raosaheb Danve
karnataka Maharashtra Border Dispute : कर्नाटक दौरा रद्द ; फडणवीसांनी सांगितलं कारण, म्हणाले..

सध्या जो व्हिडिओ व्हायरल होत आहे, तो नाशिक येथील 2 वर्षांपूर्वीचा आहे. हा व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल करण्यात आला आहे. मी ते वक्तव्य काल किंवा आज केल्यासारखे दाखवण्यात येत आहे. माझ्या त्या विधानाची मी तेव्हाच माफी मागितली होती. आताही पुन्हा एकदा मी जनतेची माफी मागतो. आज मी शिवाजी महाराज यांच्याबद्दल असे कोणतेही वक्तव्य केलेले नाही मी ते वक्तव्य आज केल्याचे दाखवले जात असून ते चुकीचे आहे, असा खुलासा दानवेंनी केला आहे.

"दोन वर्षांपूर्वी तेथील पत्रकारांनी मला राज्यपालांच्या बोलण्यावर प्रतिक्रिया विचारली होती. त्यावेळी मी अनावधानाने शिवाजी महाराजांचा एकेरी शब्दांमध्ये उल्लेख केला. तेव्हा माझ्यावर टीकेची झोड उठली होती. मी तेव्हा समस्त देशवासीयांची माफी मागितली होती. तो व्हिडीओ दोन वर्षांपूर्वीचा आहे. तेव्हाही माफी मागितली होती," असे दानवे म्हणाले.

काही दिवसांपासून सत्ताधारी भाजपा आणि शिंदे गटाच्या नेत्यांकडून सातत्यानं छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच आहे. त्यावरून राष्ट्रवादी-कॉंग्रेससह शिवसेनेनं सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com