राजकारण तापलं! नारायण राणेंपाठोपाठ कपिल पाटलांनी घेतली ठाकुरांची गुप्त भेट

केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी हितेंद्र ठाकूर यांची गुप्त भेट घेतली असून, या भेटीची कल्पनाही स्थानिक भाजप नेत्यांना नव्हती.
Kapil Patil meets Hitendra Thakur
Kapil Patil meets Hitendra Thakur Sarkarnama
Published on
Updated on

विरार : वसई विरार (Vasi Virar) हा आमदार हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांचा बालेकिल्ला असून, वसई विरार महापालिकेवर त्यांची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे त्यांना आपल्याकडे खेचून घेण्याचा प्रयत्न सर्वच राजकीय पक्षांकडून सुरू आहे. महापालिकेच्या निवडणुका लवकरच लागणार असल्याने आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. केंद्रीय मंत्री कपिल पाटील (Kapil Patil) यांनी हितेंद्र ठाकूर यांची गुप्त भेट घेतली. या भेटीची कल्पनाही स्थानिक भाजप नेत्यांना नव्हती. दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे ( Narayan Rane) यांनीही नुकतीच ठाकुरांची भेट घेऊन धक्का दिला होता. यामुळे आगामी निवडणुकीआधी मोठ्या घडामोडी घडण्याची चिन्हे दिसत आहेत.

कपिल पाटील यांनी बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा आमदार हितेंद्र ठाकूर यांची विरार येथील कार्यालयात भेट घेतली. या भेटीत सुमारे 2 तास बंद दाराआड काय चर्चा झाली. ही भेट आगामी निवडणुकीची समीकरणे बनविण्यासाठीच असावी, असे समजते. सरपंच ते केंद्रीय मंत्री अशी वाटचाल असलेल्या कपिल पाटील आणि हितेंद्र ठाकूर यांची मैत्री सर्वश्रृत आहे. ठाणे जिल्हा परिषद व ठाणे जिल्हा बॅंकेवर दोघांची अनेक वर्ष एकत्रितपणे सत्ता होती. नुकत्याच झालेल्या ठाणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही महाविकास आघाडीच्या विरोधात कपिल पाटील आणि हितेंद्र ठाकूर एकत्र आले होते. त्यांनी 21 पैकी 17 जागा जिंकून बँकेवर एकहाती सत्ता मिळवली होती.

Kapil Patil meets Hitendra Thakur
'बार्शी स्कॅम' प्रकरणात मोठी घडामोड : फटे पिता-पुत्रांची न्यायालयात धाव

काही महिन्यांपूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही पक्षीय दौरा बाजुला ठेवून हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली होती. त्यावेळी राणे यांच्यावर स्थानिक भाजपच्या नेत्यांनी टीका केली होती. यामुळे कपिल पाटील यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना कल्पना न देता ठाकूर यांची भेट घेतली. या भेटीमुळे स्थानिक नेते नाराज झाल्याचे समजते. पालघर जिल्ह्यातील प्रश्नांबाबत बहुजन विकास आघाडीचे शिष्टमंडळ ऑगस्ट 2021 मध्ये केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना भेटले होते. त्याअनुषंगाने कपिल पाटील यांनी बहुजन विकास आघाडीच्या विरार येथील मुख्यालयाला भेट दिल्याचे सांगण्यात येत आहे. असे असले तरी ही भेट नवी समीकरणे जुळविण्यासाठी असल्याचा दावा भाजपचे नेते करीत आहेत.

Kapil Patil meets Hitendra Thakur
मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का! बंडखोरी करून भाऊच उतरला मैदानात

ठाकूर आणि पाटील यांच्या दोन तासांच्या भेटीत पालघर जिल्ह्यातील विविध समस्यांबाबत चर्चा झाली आणि त्यासंदर्भात ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन कपिल पाटील यांनी दिल्याचे सांगण्यात आले. या वेळी आमदार राजेश पाटील, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, महापौर राजीव पाटील, जि.प. ठाणे माजी अध्यक्ष बबनशेठ नाईक, काशिनाथ पाटील, माजी महापौर नारायण मानकर, रूपेश जाधव आणि प्रवीण शेट्टी, उपमहापौर उमेश नाईक, जिल्हा बॅंकेचे संचालक प्रशांत पाटील, योगेश पाटील, माजी सभापती पंकज ठाकूर, प्रफुल्ल साने, भरत गुप्ता आणि यज्ञेश्वर पाटील, महिला बालकल्याण समिती सभापती माया चौधरी आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com