विद्यापीठाचे कुलगुरू युवा सेनेच्या किचन कॅबिनेटमध्ये ठरवणार ?

सरकारने केलेल्‍या नियुक्‍त्‍या पाहता एक नवीन सचिन वाझे (Sachin Vaze) विद्यापीठात नियुक्‍त करण्‍यात यावा यासाठी हे अधिकार राज्‍य शासनाने आपल्‍याकडे घेतले आहेत.
Ashish Shelar

Ashish Shelar

Sarkarnama

Published on
Updated on

मुंबई : विद्यापीठांचे कुलगुरु नेमण्याचा राज्यपालांकडे असलेला अधिकार राज्य शासनाने (State Government) आपल्याकडे घेतल्‍यामुळे यापुढे राज्यातील विद्यापीठातील कुलगुरू युवा सेनेच्या (Yuva Sena) किचन कॅबिनेटमध्ये ठरवला जाईल, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे (BJP) आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केली आहे.एखाद्या सचिन वाझेसारख्या (Sachin Vaze) व्यक्तीला कुलगुरू करायचे आहे का? अशा व्यक्तीच्या स्वाक्षरीने विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देणार का?अशा शब्दात भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

<div class="paragraphs"><p>Ashish Shelar</p></div>
भाजपाशी युतीबाबत राज ठाकरे म्हणाले; कुणाकडे गहाण ठेवायला मी पक्ष काढलेला नाही

भाजपा प्रदेश कार्यालयात घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत आमदार शेलार म्हणाले की, मंत्रिमंडळ बैठकीत काल निर्णय झाला. त्यामध्ये महाराष्‍ट्र सार्वजनीक विद्यापीठ कायद्या 2016 मध्ये बदल केले असुन कलम 9(अ) हे नवीन कलम टाकून राज्यपालांचे अधिकार काढून घेण्याचे काम सरकारने केले आहे. पुर्वीच्‍या कायद्यानुसार कुलगुरू निवड करण्‍यासाठी राज्‍यपाल शोध समिती गठीत करीत असत ज्‍या समितीमध्‍ये सर्वोच्‍च न्‍यायालयाचे निवृत्‍त न्‍यायमुर्ती किंवा उच्‍च न्‍यायालयातील निवृत्‍त न्‍यायाधीश, बरोबरीने शिक्षण तज्ञ, पद्म पुरस्‍कार प्राप्‍त यासह उच्‍च शिक्षण विभागाचे सचिव अशी कमिटी गठीत करून ही समिती कुलगुरुपदासाठी अर्जदार व्‍यक्‍तींच्‍या कागदत्रांची छाननी करून त्‍यातील पाच नावांची शिफारस राज्‍यपालांना करीत असे.

<div class="paragraphs"><p>Ashish Shelar</p></div>
पुण्याचे महापौर मोहोळ देशातील महापौरांना सांगणार 'स्वच्छ भारत मिशन'चा अनुभव !

ठाकरे सरकारला हे मान्‍य नाही. निवृत्‍त न्‍यायमुर्ती, शिक्षण तज्ञ हे काहीही मान्‍य नाही. नवीन बदलानुसार आता कुलगुरू नियुक्‍तीसाठी सरकार एक समिती गठीत करणार असून त्‍यातील सदस्‍य पण राज्‍य सरकारच ठरवणार आहे. त्‍या समितीने जी नावे सुचविली जातील त्‍यातील दोन नावे कुलपती म्‍हणून राज्‍यपालांकडे मांडली जाणार आहेत. याचा सरळसरळ राजकीय अर्थ असा आहे की, यापुढे राज्यातील विद्यापीठातील कुलगुरू युवा सेनेच्या किचन कॅबिनेटमध्ये ठरवले जातील. यापुर्वी ठाकरे सरकारने केलेल्‍या नियुक्‍त्‍या पाहता एक नवीन सचिन वाझे विद्यापीठात नियुक्‍त करण्‍यात यावा यासाठी हे अधिकार राज्‍य शासनाने आपल्‍याकडे घेतले आहेत, असा आरोप आमदार शेलार यांनी केला.

राजाबाई टॉवर एक काळ इंग्रजांसमोरही दिमाखात उभा राहिला त्‍या राजाबाई टॉवरला मंत्रालयासमोर झुकवण्‍याचे काम ठाकरे सरकार करत आहे. हाच अहंकार ठाकरे सरकारचा आहे. मी ठरवेन तेच धोरण मीच बांधेन तेच तोरण हीच ठाकरे सरकारची कार्यपध्‍दती असून विद्यापीठांच्‍या स्‍वायत्‍तेवर हे आक्रमण आहे. हे नव्‍याने नसून यापुर्वी ज्‍यावेळी अंतीम वर्ष विद्यार्थ्‍यांच्‍या परीक्षांच्‍या विषयातही असाच अहंकारी निर्णय घेण्‍यात आला होता. यापूर्वी विद्यापीठाच्‍या निविदांमध्‍ये सुध्‍दा हस्‍तक्षेप करण्‍यात आला होता. विद्यापीठातील प्राध्‍यापक मंत्री कार्यालयात काम करणार आणि पगार मात्र विद्यापीठांने द्यावे असेही करण्‍यात आले. अशा प्रकारे विद्यापीठांच्‍या निधीवर आक्रमण करण्‍यात आली असून आता एक पाऊल पुढे टाकण्‍यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com