संजय पांडेंचा पत्ता कट! महासंचालकपदासाठी तीन पोलीस अधिकारी शर्यतीत

केंद्रीय लोकसेवा आयोगाने पाठवलेल्या यादीत संजय पांडे यांच्या नावाचा समावेश नाही.
Sanjay Pandey, K Venkatesham, Hemant Nagrale and Rajnish Seth
Sanjay Pandey, K Venkatesham, Hemant Nagrale and Rajnish Seth Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : महाराष्ट्राचे हंगामी पोलीस महासंचालक (DGP) संजय पांडे (Sanjay Pandey) या पदासाठी पात्र नसल्याची शिफारस केंद्रीय लोकसेवा आयोगाने केली आहे. मागील काही महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या पत्रव्यवहाराला आता आयोगाने उत्तर दिले आहे. पांडे यांच्या नावावर फुली मारण्यात आल्याने महासंचालकपदासाठी रजनीश सेठ, डॉ.वेंकटेशम आणि हेमंत नगराळे या तीन अधिकाऱ्यांच्या नावांची शिफारस केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्यानुसार लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या नावांपैकीच एका अधिकाऱ्याची निवड करणे बंधनकारक आहे. यामुळे पांडे यांना पायउतार व्हावे लागणार हे निश्वित झाल्याचे मानले जात आहे. प्रकाशसिंग यांच्यासंबंधात सर्वोच्च न्यायालयाने लोकसेवा आयोगाने केलेल्या शिफारशीतील एकाची नेमणूक करावी, असा निवाडा दिला आहे. पोलीस महासंचालक पदावरील व्यक्तीची निवड राजकीय मर्जीनुसार होऊ नये, यासाठी केलेली ही तरतूद आहे.

Sanjay Pandey, K Venkatesham, Hemant Nagrale and Rajnish Seth
आर्यनची अटक महागात; मलिक यांच्यानंतर आता शाहरूख आणणार वानखेडेंना अडचणीत

दरम्यान, महाराष्ट्रातील काही सनदी अधिकाऱ्यांनी लोकसेवा आयोगाने केलेल्या शिफारशी प्रत्यक्षात आणणे बंधनकारक नसल्याची भूमिका घेतली आहे. काही राज्यांनी लोकसेवा आयोगाचा सल्ला न घेता महासंचालकाची निवड केली आहे. काही राज्यांनी आयोगाच्या शिफारशी धुडकावून लावल्याची उदाहरणेही आहेत. या संदर्भातील अंतिम निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हेच घेतील, असे गृह विभागाने स्पष्ट केल्याचे समजते.

Sanjay Pandey, K Venkatesham, Hemant Nagrale and Rajnish Seth
मनीष तिवारींसह अनेक काँग्रेस नेते पक्षत्यागाच्या तयारीत; भाजपच्या गोटात चर्चा

पांडे यांनी सरकारी सेवेतून मध्यंतरात अवकाश घेवून खासगी क्षेत्रात सेवा केली होती. सुमारे दोन वर्षे, तेसुद्धा दोनदा सेवेत नसलेल्या अधिकाऱ्याला पोलीस महासंचालक करण्यास विरोध केला जाईल, अशी भीती व्यक्त केली जात होती. ही भीती अखेर खरी ठरली आहे. लोकसेवा आयोगाच्या 1 नोव्हेंबरला झालेल्या शिफारसी या 10 नोव्हेंबरच्या सुमारास मुंबईत पोचल्या आहेत. आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख रजनीश सेठ, गृहरक्षक दलाचे महासंचालक डॉ.के.वेंकटेशम आणि मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्यापैकी एकाची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी निवड केली जाऊ शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com