Video: पुतळा प्रकरणावरुन शिंदे सरकार अलर्ट! 'वर्षा'वरील बैठकीत मोठा निर्णय

Shivaji Maharaj Statue Collapsed In Malvan Cabinet meeting Eknath Shinde: पुतळा कोसळण्याची कारणे शोधण्यासाठी नौदल आणि राज्य सरकाची संयुक्त तांत्रिक समिती नेमण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
Mahayuti Leader
Mahayuti LeaderSarkarnama
Published on
Updated on

राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरुन सध्या राजकरण तापलं आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने मंत्रीमंडळाची बैठक बोलावून निर्णय घेतला आहे.

पुतळा कोसळण्याची कारणे शोधण्यासाठी नौदल आणि राज्य सरकाची संयुक्त तांत्रिक समिती नेमण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण बैठकीला उपस्थित होते.

शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारणे, त्यासाठी स्थापत्य अभियंते,जेजे स्कूल ऑफ आर्टस,नामांकित शिल्पकार, आयआयटी, नौदलाचे तांत्रिक अधिकारी आदींची एक समिती नेमण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी नेमलेली ही समिती जबाबदारी निश्चित करणार आहे. ही समिती पुतळा कोसळण्याची तांत्रिक कारणे शोधणार आहे.

Mahayuti Leader
Supriya Sule: राज्यात कॉन्ट्रॅक्टर लॉबीच 'लाडकी'; सुप्रिया सुळेंचा रोख कुणाकडे?

राजकोट किल्ल्यावर झालेली घटना दुर्दैवी आहे, शिवभक्तांच्या भावना तीव्र आहेत. नौदल दिनाच्या निमित्ताने नौदलाने चांगल्या भावनेने उभारला होता. या ठिकाणी उभारण्यात येणारा शिवरायांचा पुतळा त्यांच्या लौकिकाला साजेसा हवा. यासाठी कुठेही निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अशी दुर्घटना परत कधीच घडू नये यासाठी अतिशय काळजी घेतली पाहिजे, अशी सूचना शिंदे यांनी दिली.

बैठकीस शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, अतिरिक्त मुख्य सचिव गृह इक्बाल सिंग चहल, अतिरिक्त मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम मनिषा म्हैसकर, अतिरिक्त मुख्य सचिव नगर विकास असीम गुप्ता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, व्हाईस ऍडमिरल अजय कोचर, रियर ऍडमिरल मनीष चढ्ढा, शिल्पकार राम सुतार, विनय वाघ, शशिकांत वडके उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com