Varsha Gaikwad Vs Ujjwal Nikam : घायाळ झालेल्या वर्षा गायकवाडांनी पंजा मारलाच !

Varsha Gaikwad Uttar Madhya Lok Sabha 2024 Result : उज्ज्वल निकम यांनी सुरुवातीस सुमारे 50 हजारांचे लिड घेतले होते. त्यानंतर जोरदार मुसंडी मारत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी निकमांवर सरशी केली.
Ujjwal Nikam, Varsha Gaikwad
Ujjwal Nikam, Varsha GaikwadSarkarnama

Mumbai Lok Sabha 2024 Election News : मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर सुरू असल्याचे दिसून येत आहे. भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांनी सुरूवातीस सुमारे 50 हजारांचे लिड घेतले होते.

त्यानंतर जोरदार मुसंडी मारत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी निकमांवर सरशी केली. सध्या गायकवाड 3121 मतांनी आघाडीवर असल्याने येथील सामाना अटतटीचा सुरू असल्याचे दिसून येत आहे.

भाजपने अनेक दिग्गज्जांना घरी बसवून नवख्या उमेदवारांना तिकीट दिले. यातून भाजपअंतर्गत नाराजी असल्याचे आता स्पष्ट होत आहे. मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा खासदार राहिलेल्या पूनम महाजन यांचे तिकिट कापून भाजपने ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांना रिंगणात उतरवले. तर काँग्रेसने धारावीच्या आमदार वर्षा गायकवाड यांना तिकिट देत या निवडणुकीत रंगत आणली.

वर्षा गायकवाड 406036 मते मिळाली असून भाजपच्या उज्ज्वल निकमांना 402915 एवढी मते मिळाली आहे. या दोघांत फक्त  3121 मतांचा फरक आहे. त्यामुळे हा मतदारसंघ नेमका कुणाला साथ देणार, याकडे लक्ष आहे. दरम्यान, काँग्रेस आणि भाजपात सुरू असलेल्या घमासान संघर्षात वर्षा गायकवाड आणि उज्ज्वल निकमांची धडधड कायम आहे.

राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणानंतर होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना जशास तशी टक्कर दिली. महायुतीच्या उमेदवारांसाठी त्यांनी आपली मुंबईतील संपूर्ण ताकद पणाला लावली. आता ते महायुतीच्या उमेदवारांना नामोहरम करत असल्याचे स्पष्ट होत आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com