मराठी शाळेतील पोरंही बोलणार फाडफाड इंग्रजी; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

मागील काही वर्षांपासून मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवण्याचा पालकांचा कल वाढत चालला आहे.
Education
EducationSarkarnama

मुंबई : मागील काही वर्षांपासून मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत (English Medium School) पाठवण्याचा पालकांचा कल वाढत चालला आहे. त्यामुळे मराठी माध्यमाच्या शाळा (Marathi Medium School) ओस पडू लागल्याची तक्रार अनेकदा केली जाते. पण आता या शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या मुलांनाही फाडफाड इंग्रजी बोलता येणार आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासूनच त्याची अंमलबजावणी होणार आहे.

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी या निर्णयाची माहिती दिली. शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये बालपणापासूनच मराठीसोबतच इंग्रजीतील संकल्पना स्पष्ट होण्यासाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सर्व मराठी माध्यम शाळांत पहिलीपासून एकात्मिक आणि द्वैभाषिक अभ्यास लागू करण्यात येईल, असे गायकवाड यांनी सांगितले.

Education
ठाकरे सरकार पुरुन उरलं..भाजप दिशाहीन झालाय!

विद्यार्थ्यांना मराठीसह इंग्रजी भाषेतील संज्ञा, दैनंदिन शब्द, संकल्पना स्पष्टपणानं समजाव्यात, मराठी शब्दांच्या जोडीला सोप्या इंग्रजीमधील शब्द, वाक्यांचा उपयोग समजावा अशाप्रकारे पाठ्यपुस्तकांची रचना करावी, असे आदेश राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाना दिले आहेत.

सध्या ४८८ आदर्श शाळांत प्रायोगिक तत्वावर पहिलीच्या अभ्यासक्रमात एकात्मिक व द्वैभाषिक पुस्तकांचा समावेश करण्यात आला आहे. त्याला मिळालेले यश पाहता, राज्यभरातील शाळांत याची अंमलबजावणी करण्यात येईल. त्याचप्रमाणे टप्प्याटप्प्याने पुढील वर्गाच्या अभ्यासक्रमात इतर शाळांमध्ये याची अंमलबजावणी करण्यात येईल, पाठ्यपुस्तकांची रचना आकर्षक, जागतिक दर्जाची असावी, असेही आदेश अधिकाऱ्यांना दिल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना मराठी बरोबरच इंग्रजी भाषेतील संज्ञा, संकल्पना अधिक स्पष्ट व्हाव्यात, इंग्रजी भाषेतील शब्दांची ओळख व्हावी, यासाठी प्रा.गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे (बालभारती) संचालक विवेक गोसावी हे प्रत्यक्ष तर शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक देवेंद्र सिंग, शिक्षण संचालक (प्राथमिक) दिनकर टेमकर, शिक्षण संचालक (माध्यमिक) महेश पालकर ऑनलाईन उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com