Mahapalika Nivadnuk: ठाकुरांच्या एकहाती सत्तेला सुरुंग लावण्यासाठी भाजप-शिवसेना सज्ज : मॅरेथॉन बैठकीत फॉर्म्युला ठरला!

Vasai Virar Mahapalika Nivadnuk Mahayuti Seat Sharing:आमदार राजन नाईक यांच्या कार्यालयात झालेल्या तीन तासाच्या बैठकीत अखेर महायुतीच्या जागेचा तोडगा निघाला आहे, सध्या भाजपा 87, शिवसेना 24 जगावर अंतिम निर्णय झाला आहे. मात्र 4 जागांचा तोडगा निघाला नसून तो आज वरिष्ठ पातळीवर निघेल.
Vasai-Virar Municipal Corporation
Vasai-Virar Municipal Corporationsarkarnama
Published on
Updated on

नालासोपारा: विधानसभा निवडणुकीच्या परिवर्तनानंतर महायुतीने वसई विरार महापालिकेवर झेंडा फडकविण्यासाठी चंग बांधला आहे. त्यासाठी घटक पक्षांच्या बैठकांचा सिलसिला सुरु आहे.

वसई विरार महापालिका निवडणुकीत महायुती झाली पण जागा वाटपाचा तिढा सुटता सुटत नव्हता. आजपर्यंत 4 वेगवेगळ्या ठिकाणी बैठका झाल्या पण तू तू मै मै म्हणत जागेवर एकमत होत नव्हते.

काल (गुरुवार)भाजपाचे पालिका निवडणूक प्रभारी आमदार राजन नाईक यांच्या कार्यालयात झालेल्या तीन तासाच्या बैठकीत अखेर महायुतीच्या जागेचा तोडगा निघाला आहे, सध्या भाजपा 87, शिवसेना 24 जगावर अंतिम निर्णय झाला आहे. मात्र 4 जागांचा तोडगा निघाला नसून तो आज वरिष्ठ पातळीवर निघेल. पण आम्ही वसई विरार महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवू असा विश्वास यावेळी बैठकीतील नेत्यांनी व्यक्त केला आहे.

वसई-विरार महापालिकेवर बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकुर यांचा दबदबा आहे. त्यांच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी महायुती एकवटली आहे,

महायुतीचा रेंगाळलेला तिढा सोडविण्यासाठी भाजपा निवडणूक प्रभारी आमदार राजन नाईक यांच्या कार्यालयात काल दुपारी बैठक सुरू झाली होती. या बैठकीत भाजपाच्या जिल्हाध्यक्षा प्रज्ञा पाटील, आमदार स्नेहा दुबे पंडित, शिवसेना शिंदे गटाचे निवडणूक प्रभारी माजी आमदार रवींद्र फाटक, बोईसरचे आमदार विलास तरे, जिल्हाप्रमुख निलेश तेंडुलकर, तालुकाप्रमुख सुदेश चौधरी यांच्यात ही बैठक झाली आहे.

Vasai-Virar Municipal Corporation
Mahapalika Nivadnuk : युती जाहीर केलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत काडीमोड : जागा वाटपाची बोलणी फिस्कटताच तडकाफडकी निर्णय

चार तास सलग बैठक झाल्यानंतर महायुतीचा अंतिम जागा वाटपाचा तिढा या नेत्यांनी सोडविला आहे. मात्र अद्यापही 4 जागांबाबत पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेणार आहे. पण आम्ही महायुती म्हणून लढणार आणि जिंकणार, असा विश्वास यावेळी ने्त्यांनी व्यक्त केली. भाजपच्या वाटेल्या जागांपैकी काही जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी, आरपीआय आणि आगरी सेना यांना सोडण्यात येणार आहे.

वसई-विरार महापालिकेचा गेल्या निवडणुकीच्या पक्षनिहाय निकाल

  • एकूण जागा - 115

  • बहुजन विकास आघाडी (BVA) - 106 जागा

  • भारतीय जनता पक्ष (BJP) - 1 जागा

  • शिवसेना - 5 जागा

  • इतर / अपक्ष - 3 जागा

  • काँग्रेस (INC) - 0 जागा

  • राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) - 0 जागा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com