Vasai-Virar Municipal Reservation : साडेपाच वर्षांची प्रतीक्षा संपली! वसई-विरार आरक्षण सोडतः 58 जागा महिलांसाठी; 16 प्रभागात फक्त एकच सर्वसाधारण पुरुष जागा!

Vasai-Virar Election : वसई-विरार महापालिकेचे वाॅर्ड निहाय आरक्षण जाहीर झाले आहे. या आरक्षणानुसार 58 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
Vasai-Virar Municipal Corporation
Vasai-Virar Municipal Corporationsarkarnama
Published on
Updated on

विजय गायकवाड

Vasai-Virar News : वसई-विरार शहर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या प्रभागाची आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. आरक्षण सोडतात महिला आरक्षण आणि महिला राखीव जागेचा फटका सर्वसाधारण पुरुषांना बसला असून, 16 प्रभागात केवळ एकच जागा सर्वसाधारण पुरुषांना सुटल्या आहेत तर 20 नंबरच्या प्रभागात सर्व आरक्षण पडले असल्याने सर्वसाधारण गटाला संधी मिळणार नाही.

या महापालिका निवडणुकीत सर्वसाधारण गटात नगरसेवक बनण्यासाठी पुरुषांची मोठी स्पर्धा ही पाहायला मिळणार असून अनेकांचा हिरमोड होणार आहे. तर अनेक पक्षांना सक्षम महिला उमेदवार शोधण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

28 जून 2020 ला वसई-विरार महापालिकेचा कार्यकाळ संपल्या नंतर तब्बल साडे पाच वर्षे पालिकेचा कारभार प्रशासकाच्या हातून चालविल्या जात होता. या निवडणुकीत अनेकांनी नगरसेवक होण्याचे स्वप्न पाहिले आहे. त्यामुळे महापालिका आरक्षण सोडतिकडे अनेकांचे डोळे लागले होते. एकदाची प्रतीक्षा संपून आज अखेर महापालिकेची आरक्षण सोडत पार पडली आहे.

115 सदस्य आणि 29 प्रभागासाठी ही आरक्षण सोडत करण्यात आली आहे. यात अनुसूचित जाती (sc) साठी 05 यातील 3 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. अनुसूचित जमाती साठी (एसटी) 05 यातील 3 जागा महिलांसाठी राखीव आहेत.

नागरिकांचा मागास प्रवर्ग (obc) साठी 31 जागा आणि यातील 16 जागा ह्या महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. तर सर्वसाधारण (open) साठी 74 जागा असून, 36 जागा या महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. 115 नगरसेवका पैकी आरक्षण निहाय 58 जागा या महिलासाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत.

Vasai-Virar Municipal Corporation
Mira-Bhayandar Ward Reservation : दिग्गज सुरक्षित, पण 'या' नेत्यांना आरक्षणाचा मोठा फटका! मिरा-भाईंदर निवडणुकीत राजकीय भूकंपाचे संकेत!

'या' प्रभागात सर्वसाधारण पुरुष नाही

ग क्रमांक २० मधील अ जागा अनुसूचित प्रवर्गासाठी आरक्षित असून, ब जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाली आहे . तर महिला आरक्षणाच्या सोडतीत या प्रभागातील उर्वरित दोन्ही जागा महिलांसाठी गेल्या आहेत. क जागा नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला आणि ड जागा सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाली आहे. त्यामुळे या प्रभागात सर्वसाधारण पुरुष उमेदवाराला एकही जागा शिल्लक नाही. परिणामी या प्रभागात तयारी केलेल्या सर्वसाधारण पुरुषांना आता उमेदवारीसाठी दुसरा प्रभाग शोधावा लागणार आहे.

Vasai-Virar Municipal Corporation
राणेंना होम ग्राऊंडवरच ठाकरेंच्या शिलेदाराकडून आव्हान? “शहर विकास आघाडी”त शिंदेंची शिवसेना दाखल होण्याची शक्यता?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com