शिंदे गटाने विलीन व्हावे आणि मगच सरकार! भाजपने अट घातल्याचा आंबेडकरांचा दावा

एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपद देण्याची तयारी भाजपने दर्शवल्याचेही वृत्त आहे.
Prakash Ambedkar Latest Marathi News
Prakash Ambedkar Latest Marathi NewsSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाचा आज तिसरा दिवस आहे. पण अद्याप त्यांनी भाजपसोबत जाण्याबाबतचा निर्णय जाहीर केलेला नाही. पण शिंदे गट आणि भाजपमध्ये सत्तास्थापनेसाठी वाटाघाटी सुरू असल्याचे समजते. शिंदे हे शिवसेना सोडणार की वेगळा गट करून भाजपला पाठिंबा देणार, याबाबत संभ्रम असताना वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठा दावा केला आहे. (Eknath Shinde Latest Marathi News)

प्रकाश आंबेडकर यांनी याबाबतचे ट्विट केले आहे. शिंदे गटाने भाजपमध्ये विलीन होण्याचा प्रस्ताव ठेवल्याचे आंबेडकरांनी म्हटले आहे. पण त्यांनीही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करून चर्चेला तोंड फोडले आहे. 'एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या गटाने भाजपमध्ये विलीन व्हावे आणि मगच सरकार स्थापन होईल अशी अट भाजपने एकनाथ शिंदेंना घातली आहे?,' असं ट्विट आंबेडकरांनी केलं आहे. (Prakash Ambedkar Tweet)

Prakash Ambedkar Latest Marathi News
शिंदेंची ताकद वाढतच चाललीय; बारा खासदारही ठाकरेंची साथ सोडणार?

शिंदे यांनी सुरूवातीपासूनच आपण शिवसैनिकच राहणार असल्याचे स्पष्ट केल्याने ते भाजपमध्ये जाणार नाहीत, अशी शक्यता आहे. त्यामुळे ते वेगळा गट करूनच भाजपला पाठिंबा देत सरकारमध्ये सहभागी होतील, याचीच दाट शक्यता आहे. महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची वेळ आल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, शिंदे यांच्या बंडामागे भाजपची (BJP) आणि त्यातही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची फूस असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तरीही एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर भाजप काय आणि कशी भूमिका घेणार, याविषयी फडणवीस यांनी भाष्य केलेले नाही. (Devendra Fadnavis Latest Marathi News)

अशातच भाजपचे नेत्यांनी मात्र देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनविण्यासाठीची तयारी सुरु केल्याचे पाहायला मिळाले आहे. कधीकाळी शिवसेनेत असलेले आणि सध्याचे भाजप नेते हाजी अराफत शेख यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत अशी प्रार्थना हाजी अली दर्गा येथे केली. त्यानंतर शेख यांनी तिथून आणलेली चादर फडणवीस यांनीही माथ्याला लावली.

"एकनाथ शिंदेंचे बंड हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र मी जे भोगले ते त्यांनीही भोगले असावे. म्हणूनच हा उद्रेक झाला आहे. किमान या उद्रेकानंतर तरी राज्याच्या विकासाची खोळंबली कामे मार्गी लागतील अशी अपेक्षा आहे", असे म्हणतं त्यांनी फडणवीस मुख्यमंत्री होण्यासाठी प्रार्थना केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com