राज्यसभा निवडणुकीत चुका झाल्या त्या आता होणार नाहीत, अपघात नेहमीच होत नसतात !

काँग्रेस आणि भाजपसमोर जास्तीचा एक उमेदवार निवडून आणण्याचं आव्हान कायम आहे.
 Bhai Jagtap
Bhai Jagtap sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : विधान परिषदेसाठी (legislative council elections ) सोमवारी (ता.२०) मतदान होणार असून, राज्यसभा निवडणुकीत मिळालेल्या धड्यानंतर महाविकास आघाडी सावध पावलं टाकत आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत मतांचे गणित जुळविण्यासाठी राजकीय पक्ष आणि उमेदवारांची धावपळ सुरू आहे.

राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाची परवानगी नाकारण्यात आल्यानं विजयासाठी लागणाऱ्या मतांचा कोटा कमी झाला आहे. तरीही काँग्रेस आणि भाजपसमोर जास्तीचा एक उमेदवार निवडून आणण्याचं आव्हान कायम आहे. (legislative council elections latest news)

काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप म्हणाले, "राज्यसभा निवडणुकीत पराभव झाला हे मान्य आहे, पण अपघात नेहमी होत नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार अनुभवी नेते आहेत. आमचे आता सर्व उमेदवार जिंकून येतील. आमचा विरोधक फक्त भाजप आहे. राज्यसभा निवडणुकीत ज्या चुका झाल्या त्या आता होणार नाहीत," राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी भाई जगताप वाय बी सेंटरमध्ये आले होते, त्यानंतर जगताप हे माध्यमांशी बोलत होते.

 Bhai Jagtap
विधानपरिषद निवडणूक : खडसे-निंबाळकरांच्या भेटीचं कारण गुलदस्त्यातच

भाजपकडून प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय, प्रवीण दरेकर, उमा खापरे आणि राम शिंदे हे पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी दोन उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. शिवसेनेकडून सचिन अहिर आणि आमशा पाडवी, काँग्रेसकडून भाई जगताप आणि चंद्रकांत हांडोरे हे रिंगणात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे आणि रामराजे नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

कोणत्याच पक्षाकडे अतिरिक्त मते नसल्याने मतांच्या फोडाफोडीवर साऱ्यांनीच भर दिला आहे. सर्व पक्षांचे आमदार मुंबईत मुक्कामी आहेत. अनिल देशमुख व नवाब मलिक यांना मतदानाचा अधिकार न मिळाल्यास राष्ट्रवादीची मदार ही अपक्षांवर असेल.

राज्यसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेना व राष्ट्रवादीकडे अतिरिक्त मते होती. विधान परिषदेत मात्र कोणत्याच राजकीय पक्षांकडे अतिरिक्त मते शिल्लक उरत नाहीत. त्यातच पहिल्या व दुसऱ्या पसंतीची मते आपापल्या उमेदवारांना राजकीय पक्षांना द्यावी लागतील. विजयाकरिता पहिल्या पसंतीच्या २६ मतांची आवश्यकता असेल. त्या दृष्टीनेच सर्व पक्ष २६ मतांचे गणित जुळविण्यावर कामाला लागले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com