NCP News : राष्ट्रवादी अॅक्शन मोडवर; आल्हाट, नागवडे, शिवले यांच्यासह सात महिला पदाधिकारी बडतर्फ

Vidya Chavan News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव आणि शरद पवार यांचा फोटोही न वापरण्याचा इशारा
Vidya Chavan, Kavita Alhat, Vaishali Nagwade News
Vidya Chavan, Kavita Alhat, Vaishali Nagwade NewsSarkarnama

Sharad Pawar News : राष्ट्रवादीतील फूटीनंतर आता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या नेतृत्वाखालील पक्षीय स्तरावर कडक भूमिका घेण्याचे धोरण अवलंबिल्याचे चित्र आहे. या फूटीनंतर राज्यातील काही महिला पदाधिका-यांची महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी हकालपट्टी केली आहे.

उमा मुंडे (रायगड), दीपाली पांढरे (सोलापूर), कविता आल्हाट (पिंपरी), वैशाली नागवडे (पुणे), लोचन शिवले (पुणे), शीतल हगवणे (पिंपरी चिंचवड), प्रेरणा बलकवडे (नाशिक) यांना महिला संघटनेतील पदावरुन तातडीने बडतर्फ करत असल्याचे पत्र विद्या चव्हाण (vidya chavan) यांनी जारी केले आहे.

Vidya Chavan, Kavita Alhat, Vaishali Nagwade News
BJP's Bhiwandi workshop : भाजपचे तीन आमदार लिफ्टमध्ये अडकले; गिरीश महाजन मदतीला आले...

विद्यमान सरकारमध्ये सामील होणाऱ्या व मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या आमदारांना पाठिंबा दिल्याचे निदर्शनासा आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. हे कृत्य पक्षाच्या ध्येय धोरणांशी विसंगत असल्याने ही कारवाई करत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

या महिला पदाधिका-यांनी या पुढील काळात राष्ट्रवादी (NCP) पक्षाचे नाव, चिन्ह व शरद पवार (Sharad Pawar) यांचा फोटो व नावाचा वापर करु नये, अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही या पत्रात संबंधित महिला पदाधिका-यांना देण्यात आला आहे.

Vidya Chavan, Kavita Alhat, Vaishali Nagwade News
Pankaja & Pritam Munde News : मुंडे भगिनींची भाजपच्या राज्यस्तरीय शिबिराला दांडी; राजकीय चर्चांना उधाण...

यामध्ये सर्वच महिला पदाधिकारी राष्ट्रवादीच्या महत्वाच्या पदांवर कार्यरत होत्या. अजित पवार यांना पाठिंबा दिल्यानंतर त्यांना पक्षातून बडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आला. या पदाधिका-यांपर्यंत त्यांच्या बडतर्फीची पत्रे पोहोचविण्यात आली आहेत.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com