सरकारी अॅम्ब्युलन्समधून (108) वारेमाप पैसा कमाविण्याचे आठ दिवसांचे टेंडर काढणारे IAS अधिकारी धीरजकुमार आता थेट विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या रडारवर आले आहेत. मंत्र्यांच्या नातेवाईकाला देण्यासाठी हे टेंडर काढल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. या टेंडर प्रक्रियेला आमचा विरोध असून मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करणार असून चार हजार कोटींच्या कामाचे आठ हजार कोटी कसे लागतात? असा प्रश्नच Vijay Wadettiwar यांनी विचारला आहे.
हे टेंडर सरकारला रद्द करावे लागेल, अशी मागणी वडेट्टीवार यांनी पत्रकारपरिषदेत केली. ही मागणी सरकारने मान्य केली नाही, तर या सरकारमध्ये सर्वच लाभार्थी असतील, असा संशय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. या विषयाची बातमी आज सरकारनामा मध्ये 'IAS धीरजकुमारांनी कुणाच्या दबावाखाली 8 हजार कोटींचे टेंडर काढले ?' प्रसिद्ध होतातच याचे जोरदार पडसाद राज्यभरातून उमटत आहे.
राज्यभरातील गरीब आणि गरजू रुग्णांसाठी आधार ठरलेल्या सरकारी अॅम्ब्युलन्समधून (108) वारेमाप पैसा कमाविण्याची शक्कल शिंदे-फडणवीस-पवार सरकारमधील काही मंडळींनी लढवली आहे. वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांना 'बदली'ची भीती दाखवून अॅम्ब्युलन्सचे साडेतीन-चार हजार कोटीपर्यंतच्या टेंडर तब्बल 8 हजार कोटीपर्यंत फुगवल्याचेही यातून उघड-उघड दिसत आहे.
केवळ आठ दिवस एवढ्या शॉर्ट नोटीसवर हे टेंडर काढल्याचे आश्चर्य वडेट्टीवार यांनी व्यक्त केले. हा सर्व प्रकार गंभीर असून राज्यातील एका मंत्र्याच्या नातेवाईकाला हे टेंडर देण्यासाठीचा हा सर्व प्रयत्न असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. वडेट्टीवार यांनी नेमका कोणत्या मंत्र्यांकडे अंगुलीनिर्देश केला? हे लवकरच उघड होईल.
सरकारच्या आरोग्य व कुटुंबकल्याण खात्यांतर्गत सबंध राज्यातील शहरांसह दुर्गम भागांतील रुग्णांना मोफत वाहतूकसेवा पुरविली जाते. त्यासाठी आरोग्य खात्याच्या या योजनेसाठी वेगवेगळ्या ॲम्ब्युलन्सची सेवा पुरविण्याचे कंत्राट देण्यात येते. त्यानुसार सध्याच्या ठेकेदाराला महिन्याकाठी 33 कोटी रुपये देऊन ही सेवा देण्यात आली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
ठेकेदाराची मुदत या महिन्यात म्हणजे जानेवारी 2024 मध्ये संपते आहे. हे हेरूनच ॲम्ब्युलन्सच्या नव्या टेंडरमधून अमाप पैसा मिळवून देण्याची हमी दिलेल्या आणि गेले वर्षभर टेंडर घेण्याचा सपाटा लावलेल्या ठेकेदाराने ॲम्ब्युलन्स योजनेच्या टेंडरमधून 55 टक्के नफा देण्याचा हिशेब एका नेत्यापुढे मांडला.
टेंडरमधून दोन-सव्वादोन हजार कोटी रुपये मिळण्याची खात्री पटताच नेत्याच्या यंत्रणेने जुन्या ठेकेदाराला बाजूला करीत, नवी निविदा काढण्यापासून, ती दुपटीने फुगवून तिच्या अटी-शर्ती एकहाती तयार केल्या. निविदेत एक शब्दही इकडे-तिकडे होणार नाही, याची काळजी घेण्याची ताकीदही थेट आरोग्य खात्याच्या आयुक्तांना दिली होती. त्यामुळे हे टेंडर केवळ आठ दिवसांच्या अवधीचे निश्चित केले गेले.
तीन वर्षांसाठी सरकारी कामाचे टेंडर असताना ते दहा वर्षांच्या कामासाठी कसे ? असा प्रश्नच वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. आरोग्य खात्याचे आयुक्त IAS धीरजकुमार या सर्व प्रकरणात अडचणीत आले असून ते आता थेट विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या रडारवर आले आहेत.
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.