Mumbai News: मिलिंद देवरा, बाबा सिद्दिकी, अशोक चव्हाण यांच्यानंतर काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. भाजपचे नेते, आमदार नितेश राणेंच्या टि्वटमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. काँग्रेसमधील गळती कधी थांबणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नितेश राणे यांनी सूचक टि्वट करीत वड्डेटीवार हे भाजपच्या वाटेवर असल्याचे सांगितले आहे. "विजय वडेट्टीवार हे ओरिजनल हिंदुत्ववादी आहेत, असे राणेंनी म्हटलं आहे. 'लवकरच तुमचा आणि आमचा बॉस एकच असेल,' असे राणेंनी वडेट्टीवार यांना प्रत्युत्तर दिले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
नुकत्याच एका भाषणात राणेंनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देणारे आक्षेपार्ह विधान केले होते. समोर उपस्थित असलेल्या पोलिसांना ते म्हणाले होते, की माझे भाषण पोलिसांना रेकॉर्ड करू द्या. माझे व्हिडिओ ते स्वतःच्या बायकोला दाखवतील, पण कुणी माझं वाकड करू शकणार नाही, त्यांना जागेवर राहायचंय ना? असे वादग्रस्त विधान त्यांनी केलं होते. त्यांच्या या विधानावर वडेट्टीवार यांनी आक्षेप घेतला होता. राणेंच्या विधानानंतर भाजपला वडेट्टीवारांनी जाब विचारला होता.
महिलांचा अपमान करणारी, राज्यातील पोलिसांना आव्हान देणारी ही स्क्रिप्ट भाजपने दिली का? महिलांचा अपमान करणारी, पोलिसांना आव्हान देणारी हीच का भाजपची संस्कृती? हीच का मोदी की गॅरंटी? छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेपुढे ही भाषा?,
'कोणी केला महिलांचा अपमान ? हिंदू भगिनींना 'लव्ह जिहाद'च्या नावाने फसवले जाते तेव्हा तुम्ही कधी बोलताना दिसत नाही. विरोधी पक्षनेता हा फक्त एका धर्माच्या बाजूने बोलणारा नसतो, हे लक्षात असू द्या. महाविकास आघाडीच्या काळात पोलिसांकडून वसुली करताना तुमच्या सरकारला पोलिसांची काळजी वाटली नाही का ? असो.. आपण original हिंदुत्वादी आहात..आणि आमचे जुने सहकारी पण. काय माहीत तुमचा आणि आमचा Boss लवकरच एकच असेल. म्हणून.. इथेच थांबतो ! जय श्री राम
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.