Vijay Wadettiwar : मुंबईतील सदनिका घोटाळ्याची एसआयटी चौकशी करा; वडेट्टीवार यांची मागणी

BMC Politics : मुंबई महापालिकेत वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या सनदी अधिकाऱ्यांची तातडीने बदली करावी, अशी मागणी काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे.
Vijay Wadettiwar, Eknath shinde
Vijay Wadettiwar, Eknath shindeSarkarnama

Mumbai Political News :

मुंबईत शेकडो कोटींचा सदनिका घोटाळा झाला आहे. या घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. गंभीर बाब म्हणजे झोपडपट्टीधारकांना सदनिकांची चावी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दिली होती. त्यामुळे या घोटाळ्याला मुख्यमंत्र्यांचा वरदहस्त आहे का, असा सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे. त्याचवेळी मुंबई महापालिकेत ठाण मांडून बसलेल्या सनदी अधिकाऱ्यांची बदली करावी, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

Vijay Wadettiwar, Eknath shinde
Thane Municipal Corporation : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात ऐकावं ते नवलच; महापालिका मुख्यालयातून 'ती' महत्त्वाची नोंदवही गायब

मुंबई महापालिकेचे (Mumbai Municipal Corporation) आयुक्त इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांची अजून बदली झालेली नाही. शिवाय अश्विनी भिडे (Ashwini Bhide), वेलारासू हे वरिष्ठ आयएएस अधिकारीही जागेवरच आहेत. आयएएस नसतानाही अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे (Sudhakar Shinde) मोठ्या पदावर आहेत. हे अधिकारी मर्जीतील असल्याने ते निधी वाटपात पक्षपातीपणा करू शकतात आणि निवडणुकीदरम्यान प्रभाव पाडू शकतात, असा दावा विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला आहे. त्यामुळेच या अधिकाऱ्यांना लगेचच कार्यमुक्त करा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.

या अधिकाऱ्यांच्या बदल्या न होण्यासाठी मुख्यमंत्र्यांवर (Eknath Shinde) दबाव आहे का, त्यांच्या बदल्या न करण्यासाठी कुणी मुख्यमंत्र्यांचा हात धरला आहे का, असे प्रश्न विचारत निवडणूक भीतीमुक्त वातावरणात होण्यासाठी या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या पाहिजेत, असा आग्रह वडेट्टीवार यांनी धरला आहे. तसेच त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाला (Election Commission) पत्र पाठवल्याचीही माहिती वडेट्टीवार यांनी दिली.

क्रांतीनगर, बैल बाजार येथील झोपडीधारकांना साकीनाका येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सदनिकांची चावी वाटप करण्यात आले. हे करताना बोगस नावे घुसवण्यात आल्याचा वडेट्टीवारांचा आरोप आहे. यातील काही लोक यूपीमधील आहेत. यात 10 कोटींच्या 53 सदनिकांची बनावट कागदपत्रे बनवली आहेत. अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या संगनमताने हा घोटाळा केला असून, यात शेकडो कोटींचा घोटाळा झाल्याचा संशय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे. त्याचवेळी या घोटाळ्याची एसआयटी (SIT) मार्फत चौकशी करावी, अशी आग्रही मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.

(Edited by Avinash Chandane)

R

Vijay Wadettiwar, Eknath shinde
Sanjay Raut on Amit Shah : "ठाकरेंना लाज वाटली पाहिजे," शाहांच्या या विधानानंतर राऊतांनी सगळंच काढलं; म्हणाले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com