बीड : शिवसंग्रामचे नेते तथा माजी आमदार विनायक मेटे (Vinayak Mete) यांचे रविवारी पहाटे (Accident) कार अपघातात निधन झाले आहे. त्यांच्या या निधनामुळे राजकीय वर्तुळासह सामाजिक चळवळीतील अनेकांना त्यांच्या या निधनामुळे धक्का बसला आहे. (Vinayak Mete accident case)
त्यांच्या कुटुंबीयानाही प्रचंड मोठा मानसिक धक्का बसला आहे. विनायक मेटे यांच्या अपघाताला वेगळे वळण लागलं आहे. त्यामुळे नवनवीन खुलासे आणि माहिती समोर येत असल्याने संशयाचे ढग अधिकच दाट होत असल्याचा चित्र निर्माण झालं आहे.
विनायक मेटे यांच्या निधनानंतर अनेक नवीन खुलासे समोर येत आहे. मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांच्या आरोपानंतर मेटे यांचे दुसरे चालक समाधान वाघमारे यांनी मोठा खुलासा केला आहे. 'शिक्रापूर रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासा त्यामधून बरंच काही बाहेर येईल, अशी प्रतिक्रिया समाधान वाघमारे यांनी दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाचे धागेदोरे कुठपर्य़ंत आहेत, याबाबत अनेक शंका व्यक्त होत आहेत.
समाधान वाघमारे म्हणाले, "जर त्या दिवशी मी गाडीवर असतो तर, मी स्वतःचा जीव दिला असता. मात्र, साहेबांना काहीही होऊ दिलं नसतं. मला वाटतं शिक्रापूरच्या रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले तर यामध्ये बरंच काही मिळू शकतं,"
विनायक मेटे यांच्याकडे समाधान वाघमारे हे चालक म्हणून काम करत होते. मात्र ,14 तारखेला त्यांच्या वडिलांचे वर्षश्राद्ध होतं, त्यामुळं ते सुट्टीवर होते. समाधान वाघमारे म्हणाले की , 3 ऑगस्ट रोजी आम्ही गडबडीत मुंबईच्या दिशेने जात होतो. या दरम्यान शिक्रापूरलगत आम्हाला एका इर्टिगा गाडीने दोन वेळा चांगलाच कट मारला. या दरम्यान मी मेटे साहेबांना म्हणालो गाडी थांबवू का ? मात्र साहेब म्हणाले ते दारू प्यायले असतील, त्यामुळे तू थांबू नकोस. यावेळी आमची गाडी फक्त ८० च्या स्पीडवर होती. तर गाडीमध्ये मी, मेटे साहेब, बॉडीगार्ड ढोबळे आणि कार्यकर्ता अण्णा मायकर होता,'
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.