Crime News : पत्नी दिवसभर काय करते, कोणाशी बोलते यावर लक्ष ठेवण्यासाठी डॉक्टर पतीकडून घरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. शेजाऱ्यांशी बोलली म्हणून बेदम मारहाण करण्यात आली, अखेर सासरच्या छळाला कंटाळून अंबरनाथ येथील २६ वर्षीय विशाखा तिळकर यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. या प्रकरणात विशाखा हिच्या डॉक्टर पतीला अटक करण्यात आली आहे.
विशाखा शिंदे आणि डॉक्टर नितीन तिळकर यांचा विवाह ३० एप्रिल रोजी झाला होता. लग्नाआधी सर्व काही सुरळीत होते; मात्र लग्नानंतर परिस्थिती बदलल्याचा दावा तिच्या विशाखाच्या आई वडिलांकडून करण्यात आला आहे.
विशाखाला सासरचे लोक मानसिक आणि शारीरिक त्रास देत होते. माहेरून सोने आणि पैसे आणण्याची मागणी वारंवार केली जात होती.विशाखाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पती नितीन तिळकर यांनी घराबाहेर आणि घरात विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते, असा आरोप करण्यात आला आहे. ती कोणाशी बोलताना दिसली तर घरी आल्यानंतर तिच्यावर मारहाण केली जात होती.
दोन दिवसांपूर्वी एका शेजारी महिलेसोबत बोलल्याच्या कारणावरून विशाखाला मारहाण करण्यात आली होती. यानंतर तिने घरात आत्महत्या केली . आत्महत्या करण्यापूर्वी विशाखा हिने आपल्या सोबत घडलेल्या सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला होता. आई-वडील तिला माहेरी आणण्याच्या तयारीत असतानाच विशाखाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
या प्रकरणी अंबरनाथ येथील शिवाजीनगर पोलिसांनी विशाखाला मानसिक आणि सारी त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती डॉक्टर नितीन तिळकर, सासू छाया तिळकर, दीर निनाद तिळकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. डॉक्टर पती नितीन तिळकर याला अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.