Omraje Nimbalkar : "आम्ही आपल्यावर जीव लावलाय..."; दिल्लीतील बैठकीपूर्वीच ओमराजेंचा 'तो' जुना व्हिडिओ शेअर करत ठाकरेंच्या शिवसेनेची भावनिक साद

Shivsena UBT MP Meeting : "ओम दादा, तुम्ही तानाजी सावंतांसोबत काल दिल्लीला जाऊन आलात याची आम्हाला कल्पना आहे. पण आजच्या बैठकीला तुम्ही उपस्थित रहाल अशी अपेक्षा आहे. फक्त खासदार म्हणून नाही आमच्या कुटुंबातला सदस्य म्हणून आमचा भाऊ म्हणून आम्ही आपल्यावर जीव लावलाय."
Omraje Nimbalkar old video viral before Delhi meeting
Omraje Nimbalkar old video viral before Delhi meetingSarkarnama
Published on
Updated on

Operation Tiger : महाराष्ट्रातील कथित 'ऑपरेशन टायगर'च्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेने आपल्या सर्व लोकसभा खासदारांना 'व्हीप' जारी केला असून गुरुवारी सकाळी 11 वाजता नवी दिल्लीत संसदीय दलाची तातडीची बैठक बोलावली आहे.

या बैठकीला जे हजर राहणार नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचंही पक्षाकडून सांगण्यात आलं आहे. अशातच आता या बैठकीला सुरूवात होण्यापूर्वीच ठाकरेंच्या शिवेसनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी धाराशिवचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांना भावनिक साद घातली आहे.

अंधारे यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये ओमराजेंचा जुना व्हिडिओ शेअर केला आह. तर या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलंय की, ओम दादा, तुम्ही तानाजी सावंतांसोबत काल दिल्लीला जाऊन आलात याची आम्हाला कल्पना आहे. पण आजच्या बैठकीला तुम्ही उपस्थित रहाल अशी अपेक्षा आहे.

Omraje Nimbalkar old video viral before Delhi meeting
Shivsena Politics : ठाकरेंच्या 6 खासदारांचा पक्षप्रवेश तुर्तास लांबणीवर! 'या' अडचणींचा सामना करावा लागू नये म्हणून एकनाथ शिंदेंची नवी खेळी...

फक्त खासदार म्हणून नाही आमच्या कुटुंबातला सदस्य म्हणून आमचा भाऊ म्हणून आम्ही आपल्यावर जीव लावलाय. क्यों की, सुबह का भुला शाम को घर आये तो उसे भूला नहीं कहते.' असं म्हणत त्यांनी ओमराजेंना बैठकीसाठी हजर राहण्याचं आवाहन केलं आहे.

Omraje Nimbalkar old video viral before Delhi meeting
FDA Action : तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई; पुणे विद्यापीठातील मध्यवर्ती भोजनगृहाचा अन्न परवाना रद्द

मात्र दुसरीकडे ओम राजेनिंबाळकर यांनी "मी अद्याप कोणताही राजकीय निर्णय घेतलेला नाही. सध्या माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण सर्वात महत्त्वाचे आहे. या प्रकरणाचा महत्त्वाचा निकाल 20 जून रोजी येणार आहे. हा निकाल आल्यानंतरच मी माध्यमांशी संवाद साधून माझी पुढील अधिकृत भूमिका मांडेल. तोपर्यंत मी इतर कोणत्याही गोष्टीवर बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

शिवाय ओमराजे सध्या दिल्लीत नसून ते आपल्या कुटुंबासह पुण्यातच असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता ओम राजेनिंबाळकर या आजच्या ठाकरेंच्या संसदीय दलाच्या बैठकीला उपस्थित राहणार की नाही? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com