Vishwas Patil : जाती-धर्माचा विचार होत नव्हता तेव्हा 'धर्मवीर' म्हणत होते; विश्वास पाटलांचा पुनरुच्चार!

Vishwas Patil : यामुळे राष्ट्रपिता की महात्मा यात देखील तेढ पडेल.
Vishwas Pati
Vishwas PatiSarkarnama

Vishwas Patil : विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नसून स्वराज्यरक्षकच आहेत, असं वक्तव्य हिवाळी अधिवेशनात केले होते. यावरून राज्यातलं राजकीय वातावरण पेटलं आहे. या वक्तव्यावर भाजप आणि शिंदे गट आक्रमक होत, अजित पवारांना विरोध केला होता. यांनंतर संभाजी महाराज स्वराज्यरक्षक की धर्मवीर असा वाद निर्माण झाला होता. या वादात ज्येष्ठ लेखक पानिपतकार विश्वास पाटील यांनीही उडी घेतली होती.

विश्वास पाटील यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे.या पोस्टद्वारे पाटील यांनी धर्मवीर की स्वराज्यरक्षक या वादावर भाष्य केलं आहे.पाटील यांनी पोस्टमध्ये लिहले होते की, "संभाजीराजांना 'धर्मवीर' म्हणून अवघा महाराष्ट्र गेली 105 वर्षे ओळखतो आहे! कागदपत्रे साक्ष देतात!

Vishwas Pati
ST Workers : संप केलेल्या एसटी कर्मचाऱ्यांकडून 96 कोटींची वसुली; सदावर्तेनी केला विरोध!

आता या वादावर त्यांनी पुन्हा एकदा भाष्य केले आहे. पाटील म्हणाले, "मला वाटतं सुसंस्कृत महाराष्ट्राने हा विषय जास्त ताणू नये. यामुळे राष्ट्रपिता की महात्मा यात देखील तेढ पडेल. महापुरुषाचं वेगवेगळे लोक आपापल्या पद्धतीने वर्णन करत असतात. सर्वांचा वेगवेगळा दृष्टीकोन असू शकतो. मलातरी वाटतं ज्याने त्याने आपापल्या परीने वर्णन करावं, काही बिघडत नाही."

पुढे ते म्हणाले, मी ऐवढंच सांगितलं १९४२ साली धर्मवीर नावाचं नाटक आलं, धर्मवीर हे नाव प्रचलित आहे जात-धर्माचा विचार करत नव्हतो तेव्हा धर्मवीर म्हणत होते.जनामनाचा तो हुंकार होता, त्याचा मी आदर करतो.शहाजी महाराजांच्या समाधीचा मुद्दा मी उचलला तेव्हा राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे माझ्याबरोबर आले होते, त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे, त्यांचे नाटक जरुर बघायला जाणार, असे पाटील म्हणाले.

Vishwas Pati
''105 वर्षांपासून महाराष्ट्र संभाजीराजेंना 'धर्मवीर' म्हणून ओळखतो;पण कोल्हेंनी...''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com