Eknath Shinde News : आम्ही क्रांती केली ते पाहून आम्हाला 'ग्रँड मास्टर' म्हणतात ; एकनाथ शिंदे विरोधकांवर बरसले..

Eknath Shinde Grandmaster : मलाही 'चेकमेट' करण्याचा प्रयत्न केला जातोय.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Thane News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. बुद्धीबळ या खेळात जगात आपलं नाव कोरलेल्या भारतीय बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद एका कार्यक्रमानिमित्ताने ठाण्यात येणार असल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांचे स्वागत केले आहे. याच निमित्ताने शिंदे यांनी बुद्धिबळ या खेळातील डाव आणि संज्ञांचा वापर करीत विरोधकांवर तुफान हल्लाबोल केला. (Latest Marathi News)

Eknath Shinde
Eknath Khadse On Shivsena : शिंदे गटाबाबत एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, "भाजपात जाण्याचा निर्णय..."

मुख्यमंत्री म्हणाले, "बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांनी एकाच वेळी २२ बुद्धीबळपटूंशी मुकाबला केला. खरं तर त्यांनी राजकारणातही यायला पाहिजे होतं. कारण आम्हालाही एकाच वेळी कितीतरी विरोधकांशी मुकाबला करावा लागतो.त्यात काही तिरक्या चालीचे उंट असतात. काही अडीच घरे चालणारे घोडे असतात. काही हत्ती असतात.सगळेच एकमकांना चेकमेट करण्याच्या तयारीत असतात. मलाही चेकमेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्याचं स्वप्न काही साकार होत नाही."

Eknath Shinde
Vijay Wadettiwar News : शरद पवारांना भाजपसोबत आणण्याच्या मोदींच्या अटीचा दावा वडेट्टीवारांनी का केला ?

"विरोधकांना आपली बुद्धी कितीही पणाला लावली, जनतेच्या विश्वासाचं आणि पाठिंब्याचं बळ माझ्याकडे आहे. त्यामुळे विरोधकच चितपट होत आहेत. राजकीय विरोधकांशी लढायचं आहे तर बुद्धिबळ खेळणं फार गरजेचं आहे.मला कल्पना आहे की राजकीय बुद्धिबळ खेळणं सोपं आहे. जगात स्वतच;ची मुद्रा उमटवणे फार कठीण आहे. विश्वनाथन आनंद यांनी ते अनेकदा साध्य केलं आहे. गेल्यावर्षी आम्ही जे क्रांती केली ते पाहून आम्हाला राजकारणातले ग्रँडमास्टर म्हंटलं जातं, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com