आम्ही केवळ आश्वासने देत नाही; तर दिलेला शब्द ही पाळतोच : उदयनराजे भोसले

भविष्यात तरूणांसाठी प्ले ग्राऊंड तयार करणार आहोत. त्याचा प्रस्ताव केंद्राकडे दिलेला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरवात होणार आहे. या विस्तारित भागाला सातारा विकास आघाडीकडून अपेक्षा आहेत, त्यापूर्ण करण्याचा मानस आहे.
We give and keep our word : MP Udayanraje criticized Shivendraraje's Nagar Vikas Aghadi
We give and keep our word : MP Udayanraje criticized Shivendraraje's Nagar Vikas Aghadi
Published on
Updated on

सातारा : सातारा पालिकेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या निमित्ताने सातारच्या दोन्ही राजांत आरोप प्रत्योरोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. स्ट्रीट लाईट जोडणी कामाच्या प्रारंभप्रसंगी सातारा विकास आघाडीच्यावतीने आयोजित कार्यक्रमात खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नगर विकास आघाडीला कानपिचक्या दिल्या. ते म्हणाले, ''आम्ही केवळ आश्वासने देत नाही, आम्ही शब्द देतो आणि तो पाळतोही. सातारा विकास आघाडीकडून लोकांच्या अपेक्षा आम्ही पूर्ण करत आलो आहोत.'' We give and keep our word : MP Udayanraje criticized Shivendraraje's Nagar Vikas Aghadi

सातारा पालिकेच्या स्ट्रीट लाईट जोडणी कामाचा प्रारंभ खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सातारा विकास आघाडीचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी खासदार उदयनराजे म्हणाले, सातारा शहराची हद्दवाढ झाली आहे. या हद्दवाढीपूर्वी शहराच्या लगतापरिसर त्रिशंकू भाग, शाहूपुरी परिसर असेल येथील कचरा उचलण्याचे काम सातारा पालिकेच्यावतीने केले जात होते. आता या उपनगरांचा समावेश सातारा शहरात झालेला आहे. त्यामुळे या भागाला मुलभूत सुविधा पुरविणे हे आमचे कर्तव्य आहे.

त्याचाच एक भाग म्हणून प्रत्येक ठिकाणी स्ट्रीट लाईटचे उद्‌घाटन झालेले आहे.
पुढील आठवड्यात शाहुपूरीला पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेचे उदघाटन केले जाणार आहे. कुठलाही भाग विकास कामांपासून वंचित राहणार नाही. हद्दवाढीनंतरच्या संपूर्ण भागातील रस्त्याचे नियोजन केलेले आहे. पुढील आठवड्यात सर्वांची उद्‌घाटने होऊन कामे सुरू झाल्याची दिसतील. मुलभूत गरजा विज, पाणी, रस्ते हे पुरविणे सातारा पालिका व सातारा. विकास आघाडीचे आम्ही कर्तव्य समजतो.

भविष्यात तरूणांसाठी प्ले ग्राऊंड तयार करणार आहोत. त्याचा प्रस्ताव केंद्राकडे दिलेला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरवात होणार आहे. या विस्तारित भागाला सातारा विकास आघाडीकडून अपेक्षा आहेत, त्यापूर्ण करण्याचा मानस आहे. आम्ही केवळ आश्वासने देत नाही, आम्ही शब्द देतो आणि तो पाळतोही, असे स्पष्ट करून उदयनराजे म्हणाले, सातारा पालिका ही एकमेव पालिका आहे जी केलेल्या कामाचे पूर्तता करून वचन पूर्ती झालेल्या कामांचा फलक लावते. आता आगामी काळात पालिकेची प्रशस्त अशी नवीन प्रशासकिय इमारत आम्ही उभी करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com