`मुंबई महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी कोरोना नियंत्रणाबाबत नेमके करतात काय?'

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात अपेक्षित यश मिळत नसल्याने महापालिका प्रशासनाची झोप उडाली आहे. आयुक्तांनी 24 विभागांतील सहायक आयुक्तांना थेट निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. त्यामुळे कोरोना प्रतिबंधाचे काम करणाऱ्या आरोग्य खात्याकडे निर्णय घेण्याचे अधिकार राहिलेले नाहीत. यंत्रणेतील हा विस्कळितपणा कोरोना पसरण्यास कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.
 what does bmc commissioner praveen pardeshi doint to control coronavirus asks corportor
what does bmc commissioner praveen pardeshi doint to control coronavirus asks corportor
Published on
Updated on

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात अपेक्षित यश मिळत नसल्याने महापालिका प्रशासनाची झोप उडाली आहे. आयुक्तांनी 24 विभागांतील सहायक आयुक्तांना थेट निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. त्यामुळे कोरोना प्रतिबंधाचे काम करणाऱ्या आरोग्य खात्याकडे निर्णय घेण्याचे अधिकार राहिलेले नाहीत. यंत्रणेतील हा विस्कळितपणा कोरोना पसरण्यास कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.
 
महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. महापालिकेत चार अतिरिक्त आयुक्त आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी आणखी सहा आयएएस अधिकाऱ्यांना राज्य सरकारने महापालिकेत पाठवले आहे. त्यामुळे महापालिकेकडे कोरोना प्रतिबंधाच्या कामासाठी अधिकाऱ्यांची मोठी फळी तयार झाली आहे. आयएएस अधिकाऱ्यांचीच संख्या 11 झाली आहे. परिमंडळनिहाय उपायुक्त कार्यरत आहेत. 

कोरोनाच्या संकटात राज्य सरकारने महापालिका आयुक्तांकडे सर्वाधिकार दिले आहेत. त्यांनी या अधिकारांचे विकेंद्रीकरण करून 24 सहायक आयुक्तांना अधिकार दिले आहेत. विभाग स्तरावर सहायक आयुक्तच निर्णय घेत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. आरोग्य अधिकाऱ्यांना प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार काम करावे लागते. प्रत्यक्ष रोग नियंत्रणाचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना निर्णय घेण्याचे कोणतेही अधिकार नाहीत. त्यामुळेच मोठी अडचण निर्माण झाल्याचे दिसत आहे.

गटनेते अंधारात
सर्वच प्रभागांमध्ये कोरोना पसरला आहे. नगरसेवक आपापल्या प्रभागात कोरोनाच्या नियंत्रणाचे काम करत आहेत. राजकीय पक्षांच्या गटनेत्यांना प्रशासन विश्‍वासात घेत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात सध्या कोणताही समन्वय नसल्याचे दिसत आहे. आम्हाला अंधारातच ठेवले जाते, अशी तक्रार गटनेते करत आहेत. 

महापौरही नाराज
कोणताही निर्णय घेण्यापूर्वी महापालिका प्रशासनाने महापौर म्हणून मला माहिती द्यायला हवी; मात्र तसे होत नाही, अशी नाराजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केली. कोरोना नियंत्रणाबाबत प्रशासन नेमके काय करत आहे, याची माहिती दररोज माझ्याकडे येणे अपेक्षित आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून प्रभावी उपाययोजना राबवता येतील. नगरसेकांना प्रभागांची माहिती असल्याने कोरोनाला रोखण्यासाठी त्यांची मोठी मदत होऊ शकते, असेही त्या म्हणाल्या. 

"आय कांट टॉक...'
महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांना दूरध्वनी केला असता ते तत्काळ लघुसंदेश पाठवतात : "आय कांट टॉक राईट नाऊ.' महापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते आणि ज्येष्ठ नगरसेवकांनाही हाच अनुभव येतो. त्यामुळे कोरोना नियंत्रणाबाबत आयुक्त नेमके करतात काय, असा प्रश्‍न काही नगरसेवकांनी उपस्थित केला. यंत्रणेतील या विस्कळितपणामुळे कोरोना नियंत्रणाबाहेरच असल्याचे दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com