Uddhav Thackeray Question to PM Modi : 'त्या' सत्तर हजार कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपाचं काय झालं? ठाकरेंचा मोदींना थेट सवाल

Maharashtra Politics: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसवर ७० हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप केले होते.
Uddhav Thackeray Question to PM Modi :
Uddhav Thackeray Question to PM Modi :Sarkarnama
Published on
Updated on

Uddhav Thackeray on PM Narendra Modi : "लोकमान्य टिळक पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना. मग ८-१० दिवसांपूर्वी ज्या राष्ट्रवादी काँग्रेसवर पंतप्रधानांची सत्तर हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले होते. त्यांच्यात हस्ते हा पुरस्कार पंतप्रधान स्वीकारणार का, आता त्या सत्तर हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या आरोपांच काय झालं." असा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांनी आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्यांच्यावर तुम्ही सत्तर हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केलात, आज त्यांनाच तुम्ही तुमच्यासोबत घेतलं. आमच्यातील मिंधे तुमच्यासोबत आहेत. त्यामुळे आता तरी आरोप करताना त्या आरोपाला जागा, आरोप करताना जबाबदारीने वागा, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. (Maharashtra Politics)

Uddhav Thackeray Question to PM Modi :
Rohit Pawar on important issues : सत्तासंघर्षात राज्यातील 'या' महत्त्वाचे प्रश्नांकडे दुर्लक्ष; रोहित पवारांनी वेधलं सरकारचं लक्ष

आरोप करुन आमदारांना घाबरवून टाकून त्यांना पक्षात घेता आणि नंतर चौकशी बंद करता, मग त्या आरोपाचं काय झालं. असा सवालही उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. अजित दादांवर चक्की पिसींगची टीका केली, हा तुम्ही त्यांना कलंक लावला नव्हता का, असे आरोप करुन तुम्ही संपूर्ण खानदान बर्बाद करुन टाकता, वाट्टेल तसे आरोप करता.

अनिल परब, संजय राऊत यांना काय हे लोक कमी छळत आहेत का? मी कलंक शब्द बोललो म्हणून एवढा त्रास झाला. माझ्या झालेल्या ऑपरेशनवरुन माझी चेष्टा करतात. पण मी जे काही सहन केलं तसं तुम्हाला भोगावं लागू नये. कुणाच्या कुटुंबावर बोलता, कुणाच्या प्रकृतीवर बोलता तो कलंक नाही का? असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com