Pawar-Thackeray Meet : पवार- ठाकरेंमध्ये ‘सिल्व्हर ओक’वर काय चर्चा झाली? सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं..

Supriya Sule News : ''मीटिंगमध्ये काय-काय चर्चा झाली हे मला...''
Pawar-Thackeray Meet
Pawar-Thackeray MeetSarkarnama

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यामध्ये मंगळवारी'सिल्वर ओक'वर तब्बल सव्वा तास चर्चा झाली. या बैठकीमध्ये काय चर्चा झाली असेल? याबाबत अनेक तर्क वितर्क राजकीय वर्तुळातून लावण्यात येत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) अंतर्गत कलह सुरू असल्याची चर्चा आहे. त्या बरोबरच उद्योगपती गौतम अदानी यांच्याबद्दल शरद पवारांनी मांडलेली भूमिका आणि महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला (Vanchit Bahujan Aghadi) सामावून घेण्यासंबंधीच्या विषयाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा झाली असावी, असा तर्कही अनेक-जण लावत आहेत.

Pawar-Thackeray Meet
Sada Sarvankar : शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकरांच्या अडचणी संपेनात; आता न्यायाधीशही संतापले

मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या या बैठकीत काय चर्चा झाली? याबाबत भाष्य केलं आहे. त्या एका वृत्तवाहीनीशी बोलत होत्या.

Pawar-Thackeray Meet
Sanjay Rathod News : राठोड गिरवत आहेत भूमरेंचाच कित्ता, अधिकाऱ्यांसह विद्यार्थ्यांचीही पायपीट !

यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, ''काल सिंहासन चित्रपटाला 44 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एक कार्यक्रम होता. तो कार्यक्रम संपल्यानंतर मला घरी जायला उशीर झाला होता. त्यामुळे पूर्ण मीटिंगमध्ये मी नव्हते. त्यामुळे मीटिंगमध्ये काय काय चर्चा झाली हे मला माहित नाही. पण मी गेले त्यावेळी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये चाय पे चर्चा सुरू होती. त्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांच्या कांद्याच्या प्रश्नावर चर्चा झाली'', असं त्या म्हणाल्या.

(Edited By Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com