Sada Sarvankar : शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकरांच्या अडचणी संपेनात; आता न्यायाधीशही संतापले

Narayan Rane News : नारायण राणे सभेतील गोंधळ केल्याचे प्रकरण...
Sada Sarvankar
Sada SarvankarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: शिवसेना (शिंदे गट) आमदार सदा सरवणकर यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे. २००५ साली नारायण राणे यांची सभा उधळून लावल्याप्रकरणाची केस सध्या न्यायालयात सुरू आहे.

नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर सभा घेतली होती. त्यावेळी त्यांच्या सभेत झालेल्या गोंधळाप्रकरणी आमदार सदा सरवणकर, अनिल परब, बाळा नांदगावकर यांच्यासह इतर काही नेत्यांवर गुन्हा दाखल झाला होता.

Sada Sarvankar
Supriya Sule News : अंजली दमानियांच्या दाव्यावर सुप्रिया सुळेंची सूचक प्रतिक्रिया; आत्ता उन आहे : पण...

आता या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरू असून या सुनावणीदरम्यान यातील काही जणच न्यायालयात हजर होते. इतर काही जण मात्र गैरहजर होते. तर आमदार सदा सरवणकर यांनी न्यायालयात फक्त हजेरी लावली आणि ते निघून गेले.

त्यामुळे न्यायाधीशांनी त्यांना खडेबोल सुनावत संताप व्यक्त केला. तसेच या प्रकारामुळे न्यायालयाने नाराजीही व्यक्त केली. याबाबत सरवणकरांना न्यायालयाने नोटीसही बजावली आहे.

Sada Sarvankar
Amar Sable on Darshan Solanki : दर्शन सोलंकीच्या आत्महत्येचे नाहक राजकारण; अमर साबळे स्पष्टच बोलले

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सदा सरवणकर यांच्या विरोधात शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. त्यांनी शस्त्राचा वापर बेकायदेशीर पद्धतीने केला असल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला.

एवढंच नव्हे तर हे प्रकरण विधानसभेतही गाजलं. त्यानंतर आता नारायण राणे यांच्या २००५ सालच्या सभेतील गोंधळ प्रकरणामुळे न्यायालयाने नोटीस बजावल्याचे वृत्त समोर येत आहे. त्यामुळे सदा सरवणकर यांच्या अडचणी मात्र, संपताना दिसत नाहीत.

(Edited By Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com