Ujwal Nikam on Supreme Court Judgment: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांच्या निकालाबाबत ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांचे भाष्य

Maharashtra Political Crisis | महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालाकडे राज्यातील प्रत्येक व्यक्तीचे लक्ष लागले आहे.
Adv. Ujjwal Nikam
Adv. Ujjwal Nikam Sarkarnama

Adv. Ujwal Nikam Comments on Supreme Court Judgment : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या (Maharashtra Political Crisis) निकालाकडे राज्यातील प्रत्येक व्यक्तीचे लक्ष लागले आहे. येत्या आठवड्याभरातच सर्वोच्च न्यायालयाकडून निर्णय येण्याची शक्यता आहे. निकालासंदर्भात वेगवेगळे तर्कवितर्क काढले जात असतानाच ज्येष्ठ सरकारी वकील उज्वल निकम यांनी एक महत्त्वाचे विधान केलं आहे.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल कधी लागेल, हे सांगणं आज जरी कठीण असलं तरी माझ्या मते सर्वोच्च न्यायालयातील घटनापिठातील काही न्यायाधीश निवृत्त होणार आहेत. त्यामुळे राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल लवकरच लागेल. असं सूचक विधान उज्वल निकम यांनी केलं आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालासाठी आता फक्त चार ते पाच तारखा उरल्या आहेत. यामध्ये 8 ते 12 मे या कालावधीत सत्तासंघर्षाचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढचा आठवडा महाराष्ट्राच्या राजकारणाची भविष्यातली दिशा ठरवण्यासाठी महत्वाचा ठरू शकतो, अशी चर्चा आहे. (Supreme Court Hearing)

Adv. Ujjwal Nikam
Ajit Pawar On Raj Thackeray : राज ठाकरेंना नकलांशिवाय दुसरं येतंय काय? अजित पवारांनी उडवली खिल्ली !

या पार्श्वभूमीवरच 8 ते 12 मे या कालावधीतील तारखांकडे राज्याचे लक्ष लागले आहे. तसेच कायदेतज्ज्ञांच्या वर्तुळांमध्येही अशीच चर्चा सध्या सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल काय येणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य 15 आमदारांना अपात्र ठरवण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात अनेक दिवस सुनावणी सुरू होती. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) याबाबतचा निर्णय राखून ठेवलेला आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर 14 फेब्रुवारी ते 16 मार्च सलग सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने निकाल राखीव ठेवला. त्यामुळे आता पुढच्या आठवड्यात तरी हा निकाल लागणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com