वसई-विरार महापालिका निवडणूक कधी होणार? निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे लक्ष..

वसई विरार पालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचनेत ओबीसींचे ३१ प्रभाग होते . त्याला ओबीसी आरक्षण रद्द झाल्याचा फटका बसला आहे.
Vasai-Virar Corporation Election News
Vasai-Virar Corporation Election News

वसई ः वसई- विरार महानगरपालिकेची मुदत २८ जून २०२०  संपल्यानंतर या ठिकाणची निवडणूक होणे गरजेचे होते. परंतु कोरोनामुळे निवडणूक गेल्या वर्षभरापासून रखडली आहे. (When will Vasai-Virar municipal elections be held? Attention to the decision of the Election Commission.) आता या निडणुका कधी होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेे आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली असली तरी तिसरी लाट येणार असल्याचा इशारा देण्यात आल्याने निवडणूक पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

 कोरोनाचा  प्रादुर्भाव कमी झाला तर साधारणतः ऑक्टोबर मध्ये निवडणूका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष मोर्चे बांधणीला लागले आहेत. ( Election Commission) असे असले तरी वर्षभरापूर्वी आरक्षण झालेला कार्यक्रम आता ओबीसीचे आरक्षण रद्द झाल्याने नव्याने घ्यावा लागणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोग काय भूमिका घेते  हे औत्सुक्याचे असणार आहे.

वसई- विरार महानगर पालिका बरोबरच नवी मुंबई,कल्याण, डोंबिवली आणि कोल्हापूर महानगर पालिकेची रखडलेली निवडणूक कधी होणार याबाबत अजूनही संभ्रम आहे. (Vasai-Virar municipal Corporation) कोरोनाची दुसरी लाट कमी होत असली तरी तिसरी लाट येणार असल्याने पुन्हा निवडणुका पुढे जाणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. आता निवडणुकीचे वेळापत्रक हे कोरोनावर अवलंबुन असणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

या बाबत निवडणूक आयोगाकडून लवकरच निवडणुका घेण्याचा विचार असल्याचे  सांगण्यात आले. आता निवडणुकीसाठी नव्याने कार्यक्रम घ्यावा लागणार आहे. यापूर्वी गेल्या वर्षी फेब्रुवारी मध्ये वसई- विरार महापालिकेसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले होते. परंतु न्यायालयाने इतर मागास वर्गीयांसाठीचे(ओबीसी ) आरक्षण रद्द केल्याने ही आरक्षणे वगळून नव्याने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करावा लागणार आहे.

त्यामुळे निवडणूक आयोग निवडणूक प्रक्रिया कधी सुरु करतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे . वसई विरार पालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचनेत ओबीसींचे ३१ प्रभाग होते . त्याला ओबीसी आरक्षण रद्द झाल्याचा फटका बसला आहे. त्याच प्रमाणे प्रभाग रचना सुद्धा बदलली जाण्याचे संकेत मिळत आहेत. नव्याने एकदा एक सदस्यीय प्रभागच तयार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत असल्याने त्याचीही तयारी निवडणूक आयोगाला करावी लागणार आहे. 

प्रभाग रचना सोडत अशी..

२०२० च्या प्रभागर चना सोडतीत महापालिका क्षेत्रातील ११५ प्रभागांपैकी ५८ प्रभाग महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. यामध्ये अनुसूचित जातीसाठी असलेल्या ५ प्रभागांपैकी ३ जागा, अनुसूचित जमाती साठी असलेल्या ५ प्रभागांपैकी ३ जागा व ओबीसीच्या ३१ प्रभागातील १६ जागा महिलांसाठी राखीव करण्यात आल्या आहेत. तर सर्वसाधारणच्या ७४ प्रभागांपैकी ३६  प्रभाग महिलांसाठी राखीव करण्यात आले आहेत.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com