गुडीपाडव्याच्या मुहुर्तावर राज ठाकरे आज कोणता पिक्चर दाखवणार?

Raj Thackeray| Gudipadva Melava| MNS| मनसेच्या 16 व्या वर्धापन दिनाच्या दिवशी हा ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे, तो 2 एप्रिलला शिवतीर्थावर दाखवेन" असं सूचक वक्तव्य राज यांनी केलं होतं.
Raj Thackeray
Raj Thackeray
Published on
Updated on

मुंबई : कोरोना (Covid 19) संसर्गाची लाट ओसरल्यानंतर आज तब्बल दोन वर्षांनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) मुंबईच्या शिवाजी पार्कवर गुढीपाडवा (Gudi Padwa) मेळावा आज पार पडणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यावेळी मनसैनिकांना संबोधित करणार आहेत. त्यासाठी संपूर्ण तयारीही झाली आहे.

९ मार्चला झालेल्या मनसेच्या 16 व्या वर्धापन दिनाच्या दिवशी राज ठाकरेंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करत हा ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे, तो 2 एप्रिलला शिवतीर्थावर दाखवेन" असं सूचक वक्तव्य राज यांनी केलं होतं. त्यामुळे राज ठाकरेंची तोफ आज कोणावर धडाडणार याकडे संपूर्ण राज्याचं लभ लागल आहे.

Raj Thackeray
वानखेडेंना अडचणीत आणणाऱ्या प्रभाकर साईलचा आणखी एक गौप्यस्फोट

विशेष म्हणजे, मनसैनिकांनी या मेळाव्याचा एक टीझरही प्रसिद्ध केला आहे. आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने मनसेचा गुढीपाडवा मेळवा होणार आहे. सभेला संपूर्ण राज्यातून मनसैनिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी पुण्यात बोलताना केले होते. याचवेळी त्यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरही सडकून टीका केली होती.मात्र मागील काही काळापासून सुरु असलेल्या केंद्रीय यंत्रणांच्या कारवायांवर एक चकार शब्दही काढला नव्हता.

राज्यात सत्ताधारी पक्ष काहीच काम करत नाही. विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांना संपवण्याची कटकारस्थाने रचत आहेत. यामध्ये मात्र सामान्य जनता मनसेकडून मदत मागत असल्याचंही मत राज ठाकरेंनी म्हटलं होत. त्यासोबतच आगामी महापालिका निवडणुकीत महाराष्ट्रात मनसेचं एक सक्षम पर्याय असू शकेल, असा विश्वास सर्वसामान्यांना देण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता.

दरम्यान, राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेला हिंदुत्वाचा विसर पडल्याची सर्वच स्तरातून होऊ लागली आहे. हीच संधी साधत 23 जानेवारीच्या सभेत राज ठाकरेंनी हिंदुत्वाची कास पकडली. मात्र भाजप-शिवसेना युती तुटल्यानंतर शिवसेनेची जागा घेण्याचा प्रयत्न अजूनही मनसेकडून पाहायला मिळत नाही. याबाबत देखील आज राज ठाकरे बोलू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com