Sudhir Mungantiwar: बाळासाहेबांचे वचन कोणी मोडलं; सुधीर मुगटींवारांचा सेनेला सवाल

Sudhir Mungantiwar | कॉंग्रेसला जनतेने कौल दिला नव्हता, भाजप शिवसेनेला कौल दिला होता.
Sudhir Mungantiwar News, Maharashtra Floor test
Sudhir Mungantiwar News, Maharashtra Floor test

मुंबई : महाराष्ट्रात चांद्यापासून बांद्यापर्यंत २०१९ मध्ये भाजप शिवसेनेला (Shivsena) बहुमताचा कौल दिला. 2019 ला जनतेने काँग्रेसला झटका दिला राष्ट्रवादीला (NCP) चटका दिला. पण 24 ऑक्टोबरला 2019 दिवस उजाडला आणि हिंदूत्त्वाची भाषा करणाऱ्यांनी धोका दिला. शिवसेनेने कॉंग्रेस- राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली. दिवंगत बाळासाहेबांनी कार्ल्याच्या मंदिरात आम्ही आयुष्यात कॉंग्रेससोबत जाणार नाही, असं म्हणाले होते, मग बाळासाहेबांचं वचन कोणी मोडलं, असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी केला. रामायणाला काल्पनिक म्हणणाऱ्यांसोबत तुम्ही गेले, अशी टीकाही त्यांनी केली. (Sudhir Mungantiwar News)

विधानसभेत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आला या प्रस्तावावर बोलताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर निशाणा साधला.

Sudhir Mungantiwar News, Maharashtra Floor test
सत्तांतर होताना, बंदूक काँग्रेसच्या खांद्यावर ठेवायला नको होती...

एक दिवस सत्तेशिवाय राहू शकत नाही. विश्वासदर्शक प्रस्तावात सत्ता गेल्याची वेदना दिसत होती. सत्ता गेल्याचं दुख म्हणजे जल बिना मछली, असं आहे. पण ज्यांना खुर्ची माहिती आहे त्यांना त्याग कधी कळणार. सत्तेच्या मस्तीत, अहकांरात तुम्ही गेले. कॉंग्रेसला जनतेने कौल दिला नव्हता, भाजप शिवसेनेला कौल दिला होता. देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पद स्विकारल्यावर तुम्ही शंका घेतल्या, पण २०१९ ला अजित दादांनी जे केलं तेच आता झालंय.देवेंद्र फडणवीसांनी त्याग केला हे इतिहासात नोंद होईल. राष्ट्रवादीतले अर्धे लोक मध्यरात्री आपल्याला येऊन भेटतात. मग एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे सत्तेतून बाहेर पडले त्यांना सल्युट आहे.

अडीच वर्ष सत्तेत असताना तुम्ही काय काम केलं. या अडीच वर्षांत एक कारखाना मंत्रालयात सुरु झाला होता. नोटा छापण्याचा कारखाना सुरु केला. तुम्ही प्रमोशनच्या फाईल नाही केल्या, तुम्ही रोजगार हमी योजनेची मजूरी नाही दिली. ठेकेदारांना पैसे होते पण मजूरांना देण्यासाठी पैसे नव्हते, अशी टीकाही मुनगंटीवार यांनी केली. तुम्ही शरजील उस्मानींवर कारवाई केली नाही, पण हनुमान चालिसा वाचणाऱ्यांना तुम्ही जेलमध्ये टाकलं.

भ म्हणजे भयरहीत, ग म्हणजे गर्वरहीत आणि वा- वासनारहित पण शिवसनेने सत्तेसाठी पवित्र भगवा सोडून दिला. पण आता या राज्यात जनतेचं सरकार आलं आहे. आता या राज्यात एक न भुतो न भविष्यती असं सरकार घडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com