Ajit Pawar Statement : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण ? अजितदादांनी आपल्या स्टाईलने दिलं 'हे' उत्तर

NCP Political News : राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे तुम्ही विसरलात का?
Ajit Pawar-Sharad Pawar
Ajit Pawar-Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai: वर्षभरापूर्वी शिवसेना पक्षात घडलेल्या राजकीय घडामोडीची पुन्हा एकदा पुनरावृत्ती झालेली आहे. पण यावेळी महाराष्ट्रातील राजकारणाचे चाणक्य समजले जाणाऱ्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच ही घडामोड घडल्यानं सर्वांना धक्का बसला आहे. राज्याच्या राजकारणात अजित पवार यांनी वेगळी चूल मांडल्यानंतर घडामोडींना वेग आला आहे. दोन गटात विभागणी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोपांना वेग आला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी सोमवारी(दि.३) पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. तसेच पत्रकार परिषदेत अजित पवार यांच्या गटाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी अजित पवार यांनी शरद पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचं उत्तर आपल्या खास शैलीत दिले. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा सुरू झाले आहे.

Ajit Pawar-Sharad Pawar
Congress Party Meeting: राजकीय घडामोडींना वेग : काँग्रेसने बोलवली तातडीची बैठक; विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेस दावा करणार?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमका कोणाचा आहे? यावरून वाद सुरु झाला आहे. शरद पवार आणि अजित पवार असं दोघेही पक्षावर दावा ठोकत आहेत. झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रीय अध्यक्ष कोण असे अजित पवार यांना विचारले असता शरद पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष असे आपल्या शैलीत उत्तर देताना म्हटले आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा सुरू झाले आहे.

राष्ट्रवादी पक्ष(NCP) कोणाचा यावरून दोन्ही बाजूने वेगवेगळे वक्तव्य येत असताना दोन्ही बाजूंकडून संघटनात्मक बदल करण्यात येत आहे अजित पवार यांच्या पक्षाकडून प्रदेशाध्यक्ष पदावर सुनील तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेदरम्यान अजित पवार यांना पत्रकारांनी अनेक संघटना मग बदल केले आहे. मात्र, राष्ट्रीय अध्यक्ष कोण असा प्रश्न विचारले असता राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे तुम्ही विसरलात का? असे आपल्या शैलीत उत्तर दिले आहे.

Ajit Pawar-Sharad Pawar
Mahavikas Aaghadi News : महाविकास आघाडीतून बाहेर पडून 'एकला चलाे रे'ची भूमिका घ्यावी ! ठाकरे गटाच्या खासदाराचं मोठं विधान

राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे तुम्ही विसरलात का? त्या संदर्भात रविवारी निर्णय केलेला आहे. काल प्रफुल पटेल साहेब बोलले. मी सुद्धा 1999 साली पक्षाची स्थापना झाल्यापासून भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या कामाला सुरुवात केली. आजपर्यंतच काम उभ्या महाराष्टाने पाहिलं आहे. प्रफुल पटेल यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे यांची निवड केली आहे असं अजित पवार यांनी सांगितलं.

अजित पवार यांना सुप्रिया सुळे यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी करणार का? असा प्रश्न विचारला. त्यावरही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिलं. हकालपट्टी करण्यासाठी आमचा पक्ष काढलेला नाही. आम्ही बेरेजचं राजकारण करतो आणि पक्ष वाढवतो. आम्ही इथे काय हकालपट्टी करायला बसलो आहोत का? असं अजित पवार यांनी सांगितलं.

Ajit Pawar-Sharad Pawar
Maharashtra Cabinet Expansion: राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार?; मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले संकेत

आपल्या राज्यात आपल्या देशात पक्षाबाबत असे काही प्रश्न निर्माण झाले तर त्या संदर्भातला अधिकार कुणाला आहे तर तो निवडणूक आयोगाला आहे. निवडणूक तिथे सांगतो पक्ष कोणाकडे आहे चिन्ह कोणाकडे आहे. त्यासंदर्भात आपल्याला तिथे कळेल.आम्ही म्हणजे पक्ष आणि त्याप्रमाणेच आम्ही पुढे चाललो आहोत. पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, छगन भुजबळ, रुपाली चाकणकर, अमोल मिटकरी हे उपस्थित होते.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com