Thackeray vs Shinde : खरी शिवसेना कुणाची याचे उत्तर मिळणार; दोन्ही गटांनी सादर केली 'ही' कागदपत्र

Uddhav Thackeray vs Eknath Shinde : धनुष्यबाण नेमकं कुणाचे? उद्यापासून आयोगात प्रत्यक्ष युक्तिवादाला सुरूवात
Uddhav Thackeray-Eknath Shinde Latest News
Uddhav Thackeray-Eknath Shinde Latest NewsSarkarnama

Uddhav Thackeray On Eknath Shinde : राज्यातील सत्तासंघर्षानंतर ठाकरे गट (Shivsena Thackeray) आणि शिंदे गट यांच्यामध्ये शिवसेना नेमकं कुणाची? यावरून केंद्रीय निवडणूक आयोगात वाद सुरू आहे. या पार्श्वभूमीवरच उद्यापासून केंद्रीय निवडणूक आयोगात धनुष्यबाण नेमकं कुणाचे? यावर प्रत्यक्ष युक्तिवादाला सुरूवात होणार आहे.

त्यामुळे उद्यापासून निवडणूक आयोगात ठाकरे विरुद्ध शिंदे या लढाईचा नवा अंक पाहायला मिळणार आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाकडून शिवसेना आमचीच आहे असा दावा करण्यात आला होता. तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसेना (Shiv Sena) आमचीच आहे, असा दावा केला होता. दोन्ही गटांनी धनुष्यबाण या चिन्हावर दावा केल्यामुळे या वादावर तोडगा काढण्यासाठी शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती.

Uddhav Thackeray-Eknath Shinde Latest News
Pankaja Munde : महापुरुषांच्या अवमानाचा निषेध म्हणून पंकजा मुंडे मौन पाळणार..

त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये ठाकरे गट आणि शिंदे गटाने धनुष्यबाण चिन्हाबाबतचे कागदपत्र सादर केले. आयोगाने दोन्ही गटाचे कागदपत्र तपासले असून आता धनुष्यबाण चिन्हांबाबत प्रत्यक्ष युक्तिवादाला उद्यापासून सुरूवात होणार आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून दोन्ही बाजूंनी लाखो कागदपत्र निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेले आहेत. २२ लाख २४ हजार ९५० शपथपत्र ठाकरे गटाने सादर केले आहेत. त्यामध्ये २ लाख ८३ हजार १३५ पत्र हे संस्थात्मक विंगचे आहेत. तर १९ लाख ४१ हजार प्राथमिक सदस्य असलेले पत्र ठाकरे गटाकडून सादर करण्यात आले आहेत.

Uddhav Thackeray-Eknath Shinde Latest News
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गात नेमकी कोणाची 'समृद्धी' : काँग्रेस नेत्याने भाजपला डिवचलं!

तर शिंदे गटाकडून ४ लाख ५७ हजार १२७ पत्र सादर करण्यात आले आहेत. खासदार १२, आमदार ४० तसेच संस्थात्मक विंगचे सदस्य ७११ आणि स्थानिक संस्थामध्ये २ हजार ४६ लोकप्रतिनिधी आपल्या बाजूने असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोग (Central Election Commission) आता प्रत्यक्ष सुनावणीनंतर अंतिम निर्णय काय देणार? याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. (Uddhav Thackeray vs Eknath Shinde News)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com