फडणवीसांच्या जागेवर कोण? अजित पवार की जयंत पाटील थोपटणार दंड?

नव्या सरकारला सळो की पळो करण्याची जबाबदारी कोण घेणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
Ajit Pawar Latest Marathi News, Devendra Fadnavis Latest News, Jayant Patil Latest News
Ajit Pawar Latest Marathi News, Devendra Fadnavis Latest News, Jayant Patil Latest NewsSarkarnama

मुंबई : महाविकास आघाडी सरकार कोसळल्यामुळे नव्या सरकारचा मार्ग मोकळा झाला आहे. एकनाथ शिंदे गटाला सोबत घेऊन भाजप सत्ता स्थापन करेल. तर मागील अडीच वर्षे विरोधी पक्षनेता म्हणून ठाकरे सरकारला जेरीस आणलेले देवेंद्र फडणवीस दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे आता फडणवीस यांच्या जागी कोण येणार, याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. (Maharashtra Political Crisis)

विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची अडीच वर्षांची कारकीर्द चांगलीच गाजली. मनसुख हिरेन हत्या, सचिन वाझे प्रकरण, पेन ड्राईव्ह बॉम्ब, अनिल देशमुखांसह नवाब मलिक प्रकरण यांसह अनेक मुद्दांवर त्यांनी महाविकास आघाडी सरकारी पिसं काढली. त्यामुळे आता नव्या सरकारलाही सळो की पळो करणारा नेताच पुढील विरोधी पक्षनेते असणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

Ajit Pawar Latest Marathi News, Devendra Fadnavis Latest News, Jayant Patil Latest News
भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रिपदं? एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं...

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात 39 आमदार आहेत. हा गट भाजपला पाठिंबा देऊन सरकारमध्ये सामील होणार आहे. त्यामुळे शिवसेनेकडे (Shiv Sena) आता केवळ 16 आमदार उरले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे (NCP) 53 आणि काँग्रेसकडे (Congress) 44 आमदार आहेत. त्यामुळे सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून आता विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीकडेच येणार, हे निश्चित आहे.

राष्ट्रवादीतील दोन नेत्यांपैकी एकाकडे ही अत्यंत महत्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते. ठाकरे सरकारमध्ये अजित पवार (Ajit Pawar) हे उपमुख्यमंत्री होते. तर जयंत पाटील (Jayant Patil) हे विधीमंडळातील गटनेते होते. तसेच ते सध्या पक्षाचे प्रदेशाध्यक्षही आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद अजित पवार यांच्याकडे येणार की जयंत पाटील यांच्याकडे, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Ajit Pawar Latest Marathi News, Devendra Fadnavis Latest News, Jayant Patil Latest News
...हाच आमचा फोकस! उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

आक्रमक नेते म्हणून अजित पवार यांची ओळख आहे. तर जयंत पाटील यांच्याकडे संयमी नेते म्हणून पाहिले जाते. दोन्हीही नेत्यांना सभागृहाच्या कामकाजाचा दांडगा अनुभव आहे. पण नव्या फडणवीस सरकारला त्यांच्याच शैलीत जेरीस आणण्यासाठी आक्रमक नेता म्हणून पवारांची निवड केली जाण्याची दाट शक्यता आहे. पवारांनी हे पद स्वीकारण्यास नकार दिल्यास जंयत पाटील यांच्यावर ही जबाबदारी येऊ शकते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com