Pune News: राज्याचे मुख्यमंत्री कोणीही असले तरी काही प्रश्न असे असतात की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटावेच लागते. आम्ही जेव्हा सत्तेवर होतो, त्यावेळी विरोधातील लोक येऊन आम्हाला भेटायचे. त्यामुळे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट ही औपचारिक होती, असे सांगून अजित पवार यांनी पवार-शिंदे भेटीमागील चर्चेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. (Why did Sharad Pawar meet the Chief Minister: Ajit Pawar told Reason)
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी गुरुवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची वर्षा या निवासस्थानी जाऊन भेट घेतली हेाती. त्या भेटीनंतर राज्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. त्याबाबत अजित पवार (Ajit Pawar) यांनी पवार-शिंदे भेटीवर भाष्य केले आहे. वास्तविक मराठा शिक्षण संस्थेच्या एका कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी पवार हे मुख्यमंत्र्यांकडे गेल्याचे सांगण्यात येते.
अजित पवार म्हणाले की, राज्यातील विविध घटक हे आपले प्रश्न घेऊन शरद पवार यांना भेटत असतात. त्यांना सांगितले तर आपले प्रश्न सोडवू शकतील, असा विश्वास राज्यातील घटकांना वाटतो. त्यासंदर्भाने पवारसाहेब हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले असतील. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मी, अशोक चव्हाण आणि ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलो होतो.
'अदानी-पवार भेट का? मलाही माहिती नाही...'
उद्योगपती गौतमी अदानी आणि शरद पवार यांची जुनी मैत्री आहे, ते अनेकदा शरद पवार यांना भेटत असतात. त्यांचे काही प्रश्न, अडचण असेल तर ते पवार साहेबांना भेटत असतात. ईडनबर्गने त्यांचे प्रकरण काढले असले तरी त्यांची गुंतवणूक सुरू आहे. वेगवेगळ्या राज्यात त्यांची गुंतवणूक सुरु आहे. कोणत्या कारणासाठी ते पवारांना भेटले, हे मात्र मला माहिती नाही. कारण, गुरुवारी रात्री मी मुंबईहून पुण्याला निघाला होतो.
मुंबईतील जे. जे. रुग्णालयातील संपावर सरकारने तातडीने मार्ग काढला पाहिजे. चर्चा करून मार्ग काढण्यात सरकार कमी पडतंय, असं सध्यातरी दिसतंय. मला यात राजकारण आणयाचे नाही. पण सध्या जे. जे रुग्णालयातील परिस्थिती चिघळत चाललेली आहे, असेही पवार यांनी सरकारच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला.
बिहारमधून आलेल्या मुस्लिम मुलांविषयी सरकारने सखोल तपास केला पाहिजे. देशातील नागरिकांना त्रास होत असेल किंवा त्यांच्यावर अन्याय होत असल्यास तर त्याला वाचा फोडण्यासाठी सखोल चौकशी झाली पाहिजे, असेही पवार यांनी नमूद केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.