हा अपमान खपवून घेणार नाही, बिनशर्त माफी मागा : शालिनी ठाकरेही संतापल्या

Abdul Sattar| Shalini Thackeray| कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल ऑन कॅमेरा गलिच्छ भाषेत टीका केली होती.
Abdul Sattar| Shalini Thackeray|
Abdul Sattar| Shalini Thackeray|
Published on
Updated on

Abdul Sattar मुंबई : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल ऑन कॅमेरा गलिच्छ भाषेत टीका केली होती. त्यामुळे कालपासून राष्ट्रवादी कॅाग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. काल राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सत्तारांच्या घरावर दगडफेक केली होती. यामुळे चांगलचं वातावरण तापलं आहे. राजकीय वर्तुळातून अनेक महिलां नेत्यांच्या प्रतिक्रीया येत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शालिनी ठाकरे यांनीही यावरुन संताप व्यक्त केला आहे.

''राजकारणातील स्त्रियांबद्दल अशोभनीय, घाणेरडी भाषा वापरण्याची नवीन फॅशन महाराष्ट्रात आली आहे. अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेले विधान अत्यंत आक्षेपार्ह आहे. राजकारणातील स्त्रिया हा अपमान खपवून घेणार नाहीत. सत्तार यांनी तत्काळ बिनशर्त माफी मागावी. '' असे ट्विट करत शालिनी ठाकरे यांनी संताप व्यक्त करत सत्तार यांनी बिनशर्त माफी मागण्यास सांगितले आहे.

Abdul Sattar| Shalini Thackeray|
Abdul sattar latest news : सत्तारांची सत्तेची मस्ती उतरवली जाईल... शशिकांत शिंदे भडकले...

दरम्यान, त्यांच्या वक्तव्यावरुन वातावरण तापल्याने अखेर सत्तारांनी सिल्लोड येथील जाहीर सभेत दिलगिरी व्यक्त करत या वादावर पडदा टाकला. हे प्रकरण आणखी चिघळण्याआधीच मंत्री सत्तारांनी सिल्लोडच्या सभेत जाहीर माफी मागावी,असा आदेशच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्याने मंत्री सत्तारांनी अपेक्षेप्रमाणे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सभेत सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली आहे.

तर दूसरीकडे राज्यभरातूनही प्रतिक्रीय उमटताना दिसत आहे. शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून त्यांच्या मंत्री आणि आमदारांना जी सत्तेची मस्ती आली आहे, ही आजवरच्या महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधाऱ्यांमध्ये कधी पाहायला मिळाली नव्हती. खासदार सुप्रियाताईंविषयी सत्तारांचे वक्तव्य निषेधार्य असून त्यांनी माफी मागावी अन्यथा सत्तारांची सत्तेची मस्ती उतरवली जाईल, असा इशारा राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com