Mumbai Loksabha Election: लोकसभेच्या जागांसाठी भाजप-शिंदे गटात वाटाघाटी; श्रीकांत शिंदे सोडणार हक्काचा मतदारसंघ?

Mumbai Politics: आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या गोटात हालचाली सुरु झाल्या आहेत.
Shrikant Shinde
Shrikant Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Loksabha Election 2023 : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या गोटात हालचाली सुरु झाल्या आहेत. भाजप आणि शिंदे गटानेही मुंबईतील लोकसभा मतदारसंघाची चाचपणी सुरु केली आहे.असे असतानाच एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. (Will Shrikant Shinde leave the rightful constituency for Lok Sabha?)

Shrikant Shinde
Ambedkar & Athwale News : आंबेडकर - आठवलेंचं झालं एकमत; म्हणाले, '' उध्दव ठाकरेंनी महाविकास आघाडीतून...''

कल्याण लोकसभा मतदारसंघातून सलग दोन वेळा खासदार झालेले श्रीकांत शिंदे ठाण्यातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. तर श्रीकांत शिंदेचा ( MP Shrikant Shinde) मतदारसंघातून रवींद्र चव्हाण यांना उतरवण्यासाठी भाजप प्रयत्नशील असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, दोन-तीन महिन्यांपासूनच ही तयारी सुरु झाली होती. 2024 च्या लोकसभा निवडणुका (Loksabha Election 2024) लक्षात घेता ज्या मतदार संघांत भाजपचे खासदार नाहीत अशा सर्व ठिकाणी केंद्रीय स्तरावरुन वरिष्ठ नेते पाठवून पक्षाचे संघटन मजबूत करण्याची रचना भाजपाने आखली आहे. फेब्रुवारी महिन्यात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी कल्याण लोकसभा मतदार संघाचा दौरा केला होता.भाजपच्या गटातील या हालचालींमुळे कल्याण लोकसभा मतदारसंघावर भाजप दावा करणार या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.

Shrikant Shinde
Sushilkumar Shinde यांनी वाढवला कार्यकर्त्यांचा उत्साह, Nana Patole'चे कौतुक | Congress | Sarkarnama

दुसरीकडे, मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाकडून गजानन कीर्तिकर यांच्या विरोधात त्यांचाच मुलगा अमोल कीर्तिकर हे ठाकरे गटाकडून रिंगणात उभे राहणार आहेत.अमोल कीर्तीकरांचे कार्यकर्ते तयारीला गले आहेत. त्यामुळे सुनील प्रभूंना काय मिळणार हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे. तर दक्षिण मध्य मुंबईत शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीला जागा दिली जाण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे, अशी चर्चा सुरू आहे. (Mumbai Politics)

ठाकरे गटाने मुंबईतील लोकसभेच्या 6 पैकी 4 जागा लढण्यासाठी आग्रही आहे. यात. उत्तर पश्चिम (ठाकरे गट), उत्तर मुंबई (महाविकास आघाडी मित्र पक्ष), दक्षिण मध्य मुंबई (ठाकरे गट (वंचित)), उत्तर मध्य (महाविकास आघाडी मित्र पक्ष), दक्षिण मुंबई (ठाकरे गट), ईशान्य मुंबई (ठाकरे गट) या जागांचा समावेश असू शकतो.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com